अजित पवार यांना ‘या’ कार्यक्रमाचं आमंत्रण नाही, शिंदे श्रेय लाटण्यासाठी पुढे? कुणाची खंत?

खरं तर राजशिष्टाचाराप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते यांना निमंत्रण असणं आवश्यक होतं, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.

अजित पवार यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही, शिंदे श्रेय लाटण्यासाठी पुढे? कुणाची खंत?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 25, 2022 | 10:42 AM

साताराः महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात सातारा (Satara, Karad) जिल्ह्यातील कराड येथील विकास कामांना निधी मिळाला. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते विकासकामाचं उद्घाटन असताना अजित पवार यांनाच निमंत्रण देण्यात आले नाही, अशी खंत माजी मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी व्यक्त केली आहे. किमान स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तरी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यायला हवी होती, असे बाळासाहेब पाटील म्हणाले. साताऱ्यातील कराड येथील तहसील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, साताऱ्यातील तहसील कार्यालयाचं विकासकाम मागील दोन वर्षांपासून सुरू होतं. मविआ काळात तसेच त्यापूर्वीही अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री होते. त्या काळात प्रशासकीय इमारत, सर्किट हाऊससाठी निधी मिळाला. आज त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण होतंय.

खरं तर राजशिष्टाचाराप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते यांना निमंत्रण असणं आवश्यक होतं. कराडच्या विकासकामातही त्यांचा नेहमीच सहभाग असतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 100 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी महापालिकेला अडीच कोटी रुपये दिले. त्यातून पाथवे विकासकाम केलं.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात ही बाब आणून द्यायला हवी होती, असे बाळासाहेब पाटील म्हणाले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची आज 38 वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या कराड येथील प्रितीसंगम समाधीस्थळावर मुख्यमंत्री अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. समाधी स्थळावर आज सर्व पक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी असेल.

याच निमित्ताने कराड येथील तहसील कार्यालयाचा उद्घाटन सोहळादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us