Dhananjay Munde | आई कुटुंबाचा खांब बनली, पत्नीने प्रचाराची धुरा सांभाळली, आताही कुटुंब पाठीशी राहणार?

| Updated on: Jan 12, 2021 | 8:12 PM

Dhananjay Munde Family : धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतच्या नातेसंबंधावर रोखठोक भाष्य केलं आहे.

Dhananjay Munde | आई कुटुंबाचा खांब बनली, पत्नीने प्रचाराची धुरा सांभाळली, आताही कुटुंब पाठीशी राहणार?
फोटो सौजन्य : धनंजय मुंडे फेसबुक
Follow us on

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde facebook post) यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट लिहून खळबळ उडवून दिली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोप करणारी रेणू शर्मा (Renu Sharma) ही करुणा शर्माची (Karuna Sharma) बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. (All about to know Dhananjay Mundes family)

धनंजय मुंडे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे त्यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतच्या नातेसंबंधावर रोखठोक भाष्य केलं आहे.

असं असलं तरी धनंजय मुंडे यांचं सध्याचं ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ असल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलं. विशेषत: विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे यांचं कुटुंब प्रचारात दिसलं होतं. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.

धनंजय मुंडेंचं कुटुंब

धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात आई, पत्नी, तीन मुली आहेत. मोठी मुलगी 17 वर्षांची आहे. तर दुसरी मुलगी 15 वर्षाची आहे. सर्वात लहान मुलगी 6 वर्षाची आहे. धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचं 13 ऑक्टोबर 2016 रोजी निधन झालं.

धनंजय मुंडेंच्या मातोश्री घरीच असतात. पत्नी जयश्री मुंडे यासुद्धा गृहिणी आहेत. विधानसभा निवडणुकीत पत्नीने प्रचाराची धुरा सांभाळली होती. एक महिन्यात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांची साद आणि कार्यकर्त्यांची मदत म्हणून धनंजय मुंडे यांनी बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.

धनंजय मुंडे यांच्यावर सध्या बेताचा प्रसंग ओढावला आहे. रेणू शर्मा यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रसंगामध्ये धनंजय मुंडे यांचं प्रकरण त्यांच्या पाठीशी उभं राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO | धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?

(All about to know Dhananjay Mundes family)

संबंधित बातम्या  

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली  

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?