“अमित शाहांच्या ताटाखालच्या मांजराचा दसरा मेळावा”, शिंदेच्या दसरा मेळाव्यावर टीका

| Updated on: Oct 05, 2022 | 10:49 AM

शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. काय म्हणालेत, पाहा...

अमित शाहांच्या ताटाखालच्या मांजराचा दसरा मेळावा, शिंदेच्या दसरा मेळाव्यावर टीका
Follow us on

दत्ता कानवटे, प्रतिनिधी, TV9 मराठी, औरंगाबाद : आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाला. त्यानंतर होणारा हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे यंदाच्या या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा पार पडतोय. शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यावर (Eknath Shinde Dasara Melava) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी टीका केली आहे.

अमित शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा आहे, अशा शब्दात दानवे यांनी एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका केली आहे. आमचा दसरा मेळावा हा या गद्दारांच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आहे. पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत हे या राक्षसांचा नायनाट झालेला असेल, असं दानवे म्हणालेत.

एक दिवस भारतीय जनता पार्टीच या गद्दारांना मातीत मिसळवणार आहे, असंही दानवे म्हणाले आहेत. आज होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सगळ्याचं लक्ष आहे. अशात दानवेंनी हा शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी कर्णपुरा देवीची आरती केली. दसरा मेळाव्याला निघण्याआधी दोन्ही नेत्यांकडून कर्णपुरा देवीची आरती करण्यात आली. कर्णपुरा देवीची आरती करून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दसरा मेळाव्यासाठी निघाले. कर्णपुरा देवी ही औरंगाबादचे ग्रामदैवत आहे. त्याचं दर्शन या दोन्ही नेत्यांनी घेतलं आहे. दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांनी ग्रामदेवेतेला साकडं घातलंय. कर्णपुरा देवीच्या आरतीनंतर चंद्रकांत खैरे अंबादास दानवे विमानाने मुंबईत दाखल झालेत.