पूजनीय म्हणत ‘तिला’ डांबून ठेवू नका, रास्व संघात महिला सशक्तीकरणाच्या विचारांचं सोनं…

महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विजया दशमीला आज नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचं सशक्तीकरण आणि जगात प्रगती करण्याच्या विचारांचं सोनं लुटलं

पूजनीय म्हणत 'तिला' डांबून ठेवू नका, रास्व संघात महिला सशक्तीकरणाच्या विचारांचं सोनं...
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 9:47 AM

नागपूरः सुरक्षा आणि पूजनीयतेच्या नावाखाली माहिलाशक्ती, मातृशक्तीला (Matrushakti) आपण घरात डांबून ठेवलंय. तिला स्वतंत्र विचार करण्याची, निर्णय घेण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना सर्वच क्षेत्रात समानतेचा अधिकार दिला पाहिजे, असं वक्तव्य सरसंघचालक  डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज केलं. विजया दशमीनिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयात आज सकाळीच कार्यक्रमांना सुरुवात झाली. विशेष म्हणजे आजच्या या मेळाव्यात माउंट एव्हरेस्टवर पहिल्यांदा चढाई करणाऱ्या पद्मश्री संतोष यादव या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

नागपूरच्या रेशीमबाग परिसरात संघाचं पथसंचलन करण्यात आलं. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मुख्यालयात ध्वजारोहण आणि शस्त्रपूजन पार पडलं.

यावेळी भाषणादरम्यान मोहन भागवत यांनी सुरुवातीलाच मातृशक्तीच्या सशक्तीकरण केलं पाहिजे, या विषयावरून भाषणाला सुरुवात केली.

ते म्हणाले, समाज महिला आणि पुरुष या दोहोंपासून बनतो. हे दोन्ही परस्पर पूरक आहेत. कोणत्याही एकामुळे समाज घडत नसतो. आज मातृशक्तीलाही सशक्त करण्याची वेळ आली आहे. माता, जगत्जननीचं रुप मानतो. पण असं करताना आपण त्यांच्या सक्रियतेच्या कक्षा मर्यादित केल्या. सुरक्षेच्या नावाने त्यांच्या बंधनांना वैधता दिली. त्यांना जगत्जननी मानणं ठीक आहे.. पण जननी मानून किंवा पूजनीय मानून घरात बंद करणं योग्य नाही.

दोन्ही अतिवादिता सोडून मातृशक्तीला सशक्त प्रबुद्ध बनवणं. कौटुंबिक पातळीवर तसेच सर्वत्र निर्णय स्वातंत्र्य देत सक्रिय करणं याची आवश्यकता आहे, असं डॉ. भागवत म्हणाले.

त्यानंतर त्यांनी जगात भारताचा कशा प्रकारे दबदबा निर्माण होत आहे, हे वर्णन केलं. ज्याप्रकारे आपण श्रीलंका आणि युक्रेनच्या संकटातत्यांना मदत केली. जगात आपलं वजन वाढतंय. राष्ट्रीय सुरक्षेतही आपण उत्तरोत्तर यशस्वी आणि स्वावलंबी होत आहोत. कोरोना संकटानंतर आपली अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वस्थितीवर येतेय. क्रीडा क्षेत्रातही धोरणांत चांगले बदल झालेत. ऑलिंपिक, पॅरा ऑलिंपिकमध्ये आपले खेळाडू देशाचं नाव शिखरावर नेत आहेत, असं डॉ. भागवत म्हणाले.

पण प्रगतीकडे नेणारा मार्ग सहज नसतो, हेही भागवत यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आत्मनिर्भर भारत आवश्यक आहे. पण यासाठी आत्मा काय आहे, हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. त्यानंतरच पुढील मार्ग कळेल. शासन, प्रशासन. नेतृत्व, या सगळ्यात समानता हवी. कारण प्रगतीचा मार्ग सरळ, सहज नसतो. परिस्थिती जशी असेल तसंच जावं लागेल.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.