..तर अमित शाहांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार, पुण्यातील शिवसैनिकांचा इशारा

| Updated on: Dec 18, 2021 | 5:22 PM

पुण्यातील शिवसैनिकांनी अमित शाह यांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलनाचा इशारा दिलाय. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हा इशारा दिलाय.

..तर अमित शाहांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार, पुण्यातील शिवसैनिकांचा इशारा
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
Follow us on

पुणे : केंद्रीय गृह आण सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शाह यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगरमध्ये देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तर उद्या त्यांचा पुण्यात कार्यक्रम होणार आहे. अशावेळी पुण्यातील शिवसैनिकांनी अमित शाह यांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलनाचा इशारा दिलाय. कर्नाटकातील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हा इशारा दिलाय.

कर्नाटकच्या घटनेविरोधात उद्या शिवसेना अमित शाहांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार आहे. बंगळुरूमधील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सेना पदाधिकारी उद्या अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शाह यांनी वेळ दिला नाही तर आंदोलन करणार असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे. दुसरीकडे पुण्यातील शिवसैनिकांकडून जोरदार निषेध्य व्यक्त केला जातोय. पुण्यात येणाऱ्या कर्नाटकच्या बसेसवर भगव्या रंगाने छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवसेना पुणे असं लिहिण्यात येत आहे.

शिवसेनेचा इशारा

एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ जारी करून हा इशारा दिला आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचे असून तसे झाले नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांची विटंबना करण्याचे प्रकार सीमावर्ती भागात घडले आहेत. मात्र आमच्या सहनशीलतेला देखील मर्यादा आहेत. बंगळुरू येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल. तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा आहे, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. त्या घटनेचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

इतर बातम्या :

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची दखल घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

पहिल्याच वनडेमध्ये सचिनसोबत घडलेली ‘ती’ गोष्ट, तो कधीच विसरु शकत नाही!