अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी! महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका

| Updated on: Sep 01, 2021 | 9:32 PM

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं कळतंय. अनिल देशमुख यांच्या वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी! महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
Follow us on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळतेय. चतुर्वेदी यांची सीबीआयने काळी काळ चौकशी करुन त्यांची सुटका केली आहे. देशमुखांचे जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते. त्यानंतर ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. अनिल देशमुख यांच्या वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण 10 ते 12 जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केलाय. सीबीआयच्या या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. (Anil Deshmukh’s son-in-law Gaurav Chaturvedi in CBI custody)

अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीन चिट दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, देशमुख प्रकरणात अद्याप चौकशी सुरु असल्याचं सीबीआयकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, सीबीआयचा एक अहवालही त्यावेळी समोर आला होता. या अहवाल प्रकरणात सीबीआयने चतुर्वेदी यांना आणि देशमुखांच्या वकिलांना ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, जवळपास अर्धा तास चौकशी करुन चतुर्वेदी यांना सीबीआयनं सोडून दिल्याचंही कळतंय.

नवाब मलिकांचा केंद्र सरकारवर घणाघात

“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कन्या, जावई आणि वकील त्यांच्या वरळीतील सुखदा या इमारतीतून बाहेर पडत असताना त्यांची गाडी अडवून देशमुखांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना 10 ते 12 जणांनी ताब्यात घेतलं आहे. सोबत घेऊन गेले. कुठलीही माहिती त्या मुलीला देण्यात आली नाही. एकंदरीत जी कारवाई करण्यात आली आहे ती बेकायदेशीर आहे, कुठल्याही नियमांना धरुन नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की, या देशात कायद्याचं राज्य आहे का? की राज्यकर्त्यांचा नवीन कायदा या देशात लागू झालाय? याचा खुलासा सीबीआयने केला पाहिजे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

देशात मोदीशाही सुरु, सचिन सावतांची खोटक टीका

केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. “देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे ” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध! असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी सीबीआयच्या कारवाईवर टीका केलीय.

ईडीचे आतापर्यंत पाच समन्स

अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कालचं (18 ऑगस्ट) हे पाचव समन्स होत.16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.

इतर बातम्या :

Breaking : अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात, कुटुंबियांकडून अपहरणाचा आरोप

‘राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Anil Deshmukh’s son-in-law Gaurav Chaturvedi in CBI custody