आणखी एका चुलत भावाने पंकजा मुंडेंची साथ सोडली!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्‍वर मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. रामेश्वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ऐन निवडणुकीत मतदानाच्या तोंडावर चुलत भावाने धनंजय मुंडेंचा हात पकडल्याने, पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. रामेश्वर मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे दिवंगत बंधू व्यंक्टराव मुंडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी […]

आणखी एका चुलत भावाने पंकजा मुंडेंची साथ सोडली!
Follow us on

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्‍वर मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. रामेश्वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ऐन निवडणुकीत मतदानाच्या तोंडावर चुलत भावाने धनंजय मुंडेंचा हात पकडल्याने, पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

रामेश्वर मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे दिवंगत बंधू व्यंक्टराव मुंडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी भाजपचे युवानेते म्हणून काम पाहिलं. ते आजपर्यंत पंकजा मुंडेंच्या पाठिशी उभे होते.

रामेश्‍वर मुंडे यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. “पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांचे कुठलेच काम होत नव्हते. आपल्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत, रामेश्वर यांनी चुलत भाऊ धनंजय मुंडे यांचा हात पकडला आहे.

तत्पूर्वी दुपारी त्यांनी गोपीनाथ गड इथे जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

“भाजपामध्ये माझे आणि कार्यकर्त्यांचे कोणतंच काम होत नाही. सातत्याने अन्याय होत असल्याने, आपण हा निर्णय घेतला”, असं रामेश्‍वर मुंडे यांनी सांगितले.