अरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली (Arun Jaitley) यांचं शनिवारी 24 ऑगस्टला निधन झाले. जेटली यांच्या पार्थिवावर दुपारी 2.30 वाजता निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

अरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप
| Updated on: Aug 25, 2019 | 4:09 PM

Arun Jaitley नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ताठ ठेवण्यासाठी आपलं कौशल्य पणाला लावणाऱ्या अरुण जेटली (Arun Jaitley) यांचं शनिवारी 24 ऑगस्टला निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरच श्वास घेतला. फुप्फुसातील संसर्गामुळे 9 ऑगस्टपासून जेटलींवर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जेटली यांच्या पार्थिवावर रविवारी (25 ऑगस्ट) दुपारी 2.30 वाजता निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

अरुण जेटली यांचा मुलगा रोहन यांनी पार्थिवाला मुखाग्नि  दिला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह  हे निगमबोध घाटावर उपस्थित होते. अरुण जेटली यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. जेटलींच्या निधनानंतर हिमाचल प्रदेश सरकारने दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

LIVE UPDATE

[svt-event title=”अरुण जेटली यांचे पार्थिव निगमबोध घाटावर पोहोचले” date=”25/08/2019,2:28PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, पीयूष गोयल यांनी अरुण जेटली यांचे अंत्यदर्शन घेतले” date=”25/08/2019, 1:42PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अरुण जेटलींचे अंत्यदर्शन घेतले ” date=”25/08/2019, 12:33PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अरुण जेटली यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ” date=”25/08/2019,11:01AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जेटलींचे पार्थिव भाजपच्या मुख्यालयाकडे रवाना” date=”25/08/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=” काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली” date=”25/08/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी अरुण जेटली यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

[svt-event title=”अरुण जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार” date=”25/08/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] अरुण जेटली यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 4 वाजता निगमबोध अंत्यसंस्कार होणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अरुण जेटलींचे पार्थिव सकाळी 10 वाजता भाजपच्या मुख्यालयात ठेवले जाणार” date=”25/08/2019,9:28AM” class=”svt-cd-green” ] सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव नवी दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”जेटलींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी ” date=”25/08/2019,9:25AM” class=”svt-cd-green” ] सध्या जेटलींचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी कैलाश कॉलनी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहेत. [/svt-event]