अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल

| Updated on: Oct 14, 2020 | 7:50 PM

महाराष्ट्र विधीमंडळाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे.

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर विधीमंडळाने गोपनीयतेच्या अटीवर दिलेले कार्यवृत्त परवानगीशिवाय न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दोनवेळी विधीमंडळाचा हक्कभंग केल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. पुन्हा एकदा हक्कभंगाची नोटीस मिळाल्याने अर्नब गोस्वामींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे (Assembly give second Notice of infringement to Arnab Goswami ).

विधीमंडळाने पावसाळी अधिवेशनात अर्नब गोस्वामीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख आणि सरकारची विनाधार बदनामी केल्याच्या आरोपाखाली हक्कभंग नोटीस पाठवली होती. या नोटीससोबत विधिमंडळाने अर्नब गोस्वामी यांना माहितीसाठी त्या दिवशीचे कार्यवृत्त देखील गोपनीयतेच्या अटी-शर्ती घालून दिले होते. या अटी शर्तींनुसार विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयीन अथवा इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरता येऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं होतं.

अर्नब गोस्वामी यांनी पहिल्या हक्कभंगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवायच विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयात सादर केले. त्यामुळे अर्नब गोस्वामी कायदेशीर पेचात अडकण्याची दाट शक्यता आहे. विधीमंडळाने अर्नब गोस्वामी यांची ही कृती विधीमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे सांगत पुन्हा नोटीस दिली आहे.

हक्कभंग कधी होतो?

खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही, आमदार विधानसभेत जे विचार मांडतात त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.

सभागृहाचा हक्कभंग किंवा अवमान झाल्याचा प्रकार सभापतींच्या संमतीने सभागृहाच्या निदर्शनास कसा आणला जाऊ शकतो?

1. विधिमंडळ सभासदाकडून तक्रार
2. विधानसभा सचिवांचा अहवाल
3. याचिका
4. सभागृह समितीचा अहवाल

(What is Infringement breach of privilege motion)

हक्कभंग सिद्ध झाल्यास काय शिक्षा?

विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकारही सभागृहाला असतो. आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. आरोपी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.

आरोपीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. समज देणे, ताकीद देणे, आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करुन तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे.

संबंधित बातम्या :

हक्कभंग म्हणजे नेमके काय? कोणत्या शिक्षेची तरतूद?

कंगनाची चौफेर कोंडी, विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक

संबंधित व्हिडीओ :

Assembly give second Notice of infringement to Arnab Goswami