Audio Clip : ‘तुमच्या xxx का मिरच्या लागल्या?’ निषेध व्यक्त करणाऱ्या अजून एका महाराजांना शिवसेना आमदाराने झापलं

| Updated on: May 12, 2021 | 11:18 PM

अनेक महाराज गायकवाड यांच्या मांसाहार करण्याच्या सल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. मात्र, गायकवाड यांनीही या सर्व महाराजांना चांगलंच सुनावल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

Audio Clip : तुमच्या xxx का मिरच्या लागल्या? निषेध व्यक्त करणाऱ्या अजून एका महाराजांना शिवसेना आमदाराने झापलं
आमदार संजय गायकवाड आणि दहिकर महाराज यांची ऑडिओ क्लिप
Follow us on

बुलडाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड काही ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. कोरोनापासून बचावासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करा असा सल्ला आमदार गायकवाड यांनी दिला आहे. त्याबाबत स्थानिक वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर गायकवाड यांनी अनेक महाराजांचे फोन येत आहेत. त्यात हे महाराज गायकवाड यांच्या मांसाहार करण्याच्या सल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. मात्र, गायकवाड यांनीही या सर्व महाराजांना चांगलंच सुनावल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. (Conversation between  MLA Sanjay Gaikwad and Gajanan Maharaj Dahikar)

बुलडाण्यातील गजानन महाराज दहिकर यांनी आमदार गायकवाड यांना फोन केला. त्यावेळी गायकवाड यांनी मांसाहार करण्याचा दिलेल्या सल्ल्याचा दहिकर महाराज यांनी निषेध व्यक्त केला. तेव्हा गायकवाड आणि दहिकर महाराज यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

दहिकर महाराज आणि आ. गायकवाड यांच्यातील संवाद

दहिकर महाराज – हा नमस्कार साहेब, दहिकर महाराज बोलत आहे बुलडाणा जिल्हा.

आ. गायकवाड – हा बोला महाराज.

दहिकर महाराज – काही नाही ती बातमी वाचली मी. म्हणून फोन लावला तुम्हाला.

आ. गायकवाड – बरं बरं… बोला ना महाराज काय म्हणता.

दहिकर महाराज – काही नाही ती तुमची बातमी वाचली मी. त्यात तुमचे शब्द निघून गेले.

आ. गायकवाड – नाही शब्द निघून नाही गेले मी विचारपूर्वक बोललो. परिस्थिती पाहून बोललो मी.

दहिकर महाराज – आता परिस्थिती लोकांवर आहे, तर लोकांनाही समजतंच ना. आता काळानुसार, समाजानुसार लोकही चालले.

आ. गायकवाड – महाराज, लोकांना कळलं असतं तर लोकं एवढे बाहेर पडले असते का?

दहिकर महाराज – लोकांना कळलं असतं तर एवढे नेत्यांचे मोर्चे चालू आहेत ते नेत्यांना कळलं का? एवढे मोठे मोर्चे चालूच होते ना कोरोना काळामध्ये.

आ. गायकवाड – तो काळ वेगळा होता, आताची परिस्थिती वेगळी आहे.

दहिकर महाराज – आताची परिस्थिती लोकांना कळते. पण तुम्ही पेपरमध्ये बातमी टाकणं एकदम हे योग्य नाही ना.

आ. गायकवाड – कुण्या गावचे तुम्ही?

दहिकर महाराज – मी संग्रामपूर तालुका, बुलडाणा जिल्हा.

आ. गायकवाड – बरं.. तुमच्या गावात मी येऊ का तुम्ही येता आमच्या गावात? आमोरासमोर बोलू ना आपण.

दहिकर महाराज – काही हरकत नाही. आम्ही मग सगळी मंडळीच येतो तुमच्याकडे.

आ. गायकवाड – सगळे या. जेवढे असतील तुमचे ज्याच्या ज्याच्या *** मिरच्या लागल्या ते या. मी सगळ्याशी बोलतो.

दहिकर महाराज – नाही नाही.. तुम्हाला असे शब्त शोभत नाही ना. आम्ही तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय.

आ. गायकवाड – तुम्ही नका ना… तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवायची काय गरज आहे. मी जे बोललो ते बोललो. तुम्ही तुमचं कीर्तन ते बायांना सांगा, म्हाताऱ्या-कोताऱ्यांना सांगा. मला शहानपणा शिकवू नका.

दहिकर महाराज – आम्ही तुम्ही शिकवून नाही राहिलो. तुमच्याशी सविस्तर बोलून राहिलो. *** मिरच्या लागल्या हे तुम्हाला शोभत नाही ना.

आ. गायकवाड – तुम्हालाही शोभत नाही माझ्याशी अशा पद्धतीने बोलणं.

दहिकर महाराज – मी तुमच्याशी व्यवस्थित बोलून राहिलो.

आ. गायकवाड – व्यवस्थित नाही, तुम्ही खोचक बोलून राहिले.

दहिकर महाराज – खोचक नाही बोलून राहिलो.

आ. गायकवाड – तुम्हाला काय बोलायचं मला बोला मी येतो. मी अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मला वाटून राहिलं की मुसलमान मरत नाहीये नॉन व्हेज खाल्ल्याने, हिंदू मरुन राहिले म्हणून मी बोललो.

दहिकर महाराज – अरे जगद्गुरु तुकाराम महाराजनीही तुका म्हणे हरिच्या नाथा….

आ. गायकवाड – ते सगळं मला नका सांगू. ते जगद्गुरु तुकाराम महाराज सगळं मला माहिती आहे. तुम्ही नका शिकवू मला काय ते. मला नाही सांगायचं मी पण लय ज्ञानी माणूस आहे.

दहिकर महाराज – असं का…

आ. गायकवाड – हो तुमच्यापेक्षा ज्ञानी आहे मी.

दहिकर महाराज – बरं बरं काही हरकत नाही साहेब, ठीकय.

संबंधित बातम्या :

Audio: जगला तर धर्म नाही तर गेला गधीच्याxxx, फोन करणाऱ्या महाराजाला सेना आमदारानं झापलं

Audio Clip: तुमच्या महाराज लोकांनी मंडपातून बायका पळवून नेल्या..सेना आमदारानं तथाकथित महाराजाला सुनावलं

Conversation between  MLA Sanjay Gaikwad and Gajanan Maharaj Dahikar