AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Audio: जगला तर धर्म नाही तर गेला गधीच्याxxx, फोन करणाऱ्या महाराजाला सेना आमदारानं झापलं

गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये प्रशांत महाराज नावाच्या व्यक्तीला आमदार गायकवाड यांनी चांगलंच सुनावल्याचं ऐकायला मिळत आहे.

Audio: जगला तर धर्म नाही तर गेला गधीच्याxxx, फोन करणाऱ्या महाराजाला सेना आमदारानं झापलं
आमदार संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 3:26 PM
Share

बुलडाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची एक बातमी स्थानिक वृत्तपत्रात छापून आली आहे. त्यात त्यांनी कोरोनापासून बचावासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिलाय. या बातमीनंतर आमदार संजय गायकवाड यांना अनेक फोन आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये प्रशांत महाराज नावाच्या व्यक्तीला आमदार गायकवाड यांनी चांगलंच सुनावल्याचं ऐकायला मिळत आहे. (Dispute between Shiv Sena MLA Sanjay Gaikwad and Warkari Maharaj)

संजय गायकवाड यांनी मांसाहाराचा सल्ला दिल्यानंतर अनेक महाराजांनी त्यांना फोन केले आणि निषेध व्यक्त केला. अशाच एका फोनची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये प्रशांत महाराज आणि आमदार गायकवाड यांचा संवाद ऐकायला मिळत आहे. प्रशांत महाराज यांनी गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी फोन केला. त्यावेळी गायकवाड यांनीच त्यांना झापल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

प्रशांत महाराज आणि गायकवाड यांच्यातील संवाद

प्रशांत महाराज – राम कृष्ण हरी साहेब, आम्ही तुमचं पेपरचं कात्रण पाहिलं. हे बरोबर नाही. आम्ही हिंदुत्वाच्या दृष्टीने शिवसेनेकडे पाहतो.

आ. गायकवाड – मग काय झालं. यात काय हिंदुत्व सोडलं की काय?

प्रशांत महाराज – मुस्लिमांसारखं आचरण करा. ते मटण वगैरे खातात. तुम्हीही खा…

आ. गायकवाड – महाराज आपण समोरासमोर बोलूया ना, असं बोलता येत नाही. तुमचे बरेच गैरसमज मी दूर करतो.

प्रशांत महाराज – पण हे बरोबर नाही, साहेब

आ. गायकवाड – हे बघा, माझं हे आवाहन माझ्या समर्थकांसाठी, माझ्या चाहत्यांसाठी आहे. जो माझा चाहता नाही, समर्थक नाही त्याला अंगावर घेण्याची काही गरजच नाही.

प्रशांत महाराज – असं नाही ना सर, सगळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहतात आणि तुम्ही हिंदुत्ववादी पक्षाचे एक…

आ. गायकवाड – असं काही आवाहन केलं म्हणजे हिंदुत्व संपतं की काय?

प्रशांत महाराज – मग तुम्ही सर म्हणता की, देव वगैरे तुम्हाला वाचवायला येणार नाही.

आ. गायकवाड – अहो, जेव्हा तुमच्या महाराज लोकांनी मंडपातून बायका पळवून नेल्या तेव्हा तुमचा वारकरी समाज बदनाम होत नाही का?

प्रशांत महाराज – सर तुम्ही आमदार आहात, तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला हवी. तुम्ही एकावरुन सर्वांना नावं ठेवू शकत नाहीत. संपूर्ण वारकरी संप्रदाय तसा आहे का?

आ. गायकवाड – हे बघा, तुम्ही शब्दाचा अनर्थ करु नका. माझं म्हणणं हे आहे की, मुस्लिम समाज दोन्ही वेळा मांसाहार करतो म्हणून त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण कमी आहे.

प्रशांत महाराज – अहो पण आपला धर्म, शास्त्र…

आ. गायकवाड – धर्म वगैरे काही नाही. जगलात तर धर्म आहे.

प्रशांत महाराज – मग हिंदुत्ववाद वगैरे ही नाटकं आहेत का सगळी? मग कशाला म्हणायचं हिंदुत्ववादी?

आ. गायकवाड – मग फक्त किर्तन करणं म्हणजे हिंदुत्व आहे का? आमच्यासारखं तुम्ही काय 100 – 100 पोरी लव्ह जिहादच्या परत आणल्या? का आमच्यासारख्या तलवारी झेलल्या? का आमच्यासारखं तुमचं रक्त सांडलं कधी? आम्हाला नको शहाणपणा शिकवू हिंदुत्ववादाचा. ठेव फोन…

इतर बातम्या :

अकोल्यात जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

Dispute between Shiv Sena MLA Sanjay Gaikwad and Warkari Maharaj, Audio clip viral

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.