VIDEO: शिवसेना आमदार संजय गायकवाड मागे हटेनात, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच खडे बोल सुनावले असून मला सल्ला द्यायची गरज नाही, असं म्हटलंय. Devendra Fadnavis Sanjay Gaikwad

VIDEO: शिवसेना आमदार संजय गायकवाड मागे हटेनात, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका
देवेंद्र फडणवीस संजय गायकवाड

बुलडाणा: शिवसेनेचे बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तळीराम संबोधले होते. गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केलीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर संजय गायकवाड यांनी पलटवार केलाय.आमदार गायकवाड यांनी फडणवीस यांनाच खडे बोल सुनावले असून मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा. फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात,असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय. (Shivsena MLA Sanjay Gaikwad gave answer to LOP Devendra Fadnavis over his remark)

वादाला कधी सुरुवात?

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी केले होते. गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केलीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

नितेश राणेंवरही टीकास्त्र

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटवर गायकवाड यांनी टीका करत नितेश राणेंला बेडुक म्हटलं. उद्धव ठाकरेंवर टीका करायला चालते. मुख्यमंत्र्यांवर टीका करतात मग आम्ही त्यांची पूजा करायची का?, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला. नितेश राणें0चा फोनही डायल केला होता मात्र बोलणे झाले नाही, असं गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाड यांचा विषय आमच्यासाठी संपला

माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी गायकवाड यांच्यावर पलटवार केला. जे ते त्यांच्या लायकीप्रमाणं बोलत असतात, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलीय. संजय गायकवाड यांचा विषय आमच्यासाठी संपल्याचे संजय कुटे यांनी जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या:

Video: आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी, सेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

VIDEO : मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते; शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली

Published On - 7:45 pm, Mon, 19 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI