“आमच्या शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली” ; सावरकरांच्या मुद्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यानं भाजपला सुनावलं

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचे विनाकारण राजकारण केले जात आहे असंही त्यांनी यावेली सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपाल यांच्याकडून वारंवार अपमान केला जात होता.

आमच्या शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली ; सावरकरांच्या मुद्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यानं भाजपला सुनावलं
| Edited By: | Updated on: Mar 27, 2023 | 6:13 PM

औरंगाबाद : ठाकरे गटाची काल मालेगावमध्ये अलोट गर्दीत सभा उत्साहात पार पडली. मात्र या सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा काल त्यांनी दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून जोरदार राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर यांच्या विधानाबद्दल बोलल्यावर आता भाजपकडून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर आता औरंगाबादच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यावर बोलताना भाजपने आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल शहाणपण सांगू नये असा टोला त्यांनी लगावला आहे.

मालेगावमधील सभेनंतर भाजपकडून तुमच्यात हिम्मत असेल तर काँग्रेसची साथ सोडा म्हणून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते.

याच विषयावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या सडेतोड भाषेत भाजपला सुनावण्यात आले आहे. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आमची शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

तरीही भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचे राजकारण केले जात आहे. त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही उद्धव ठाकरे यांच्या मताचे राजकारण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या म्हणायचे पण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न दिला नाही आणि हे आता प्रेम दाखवत आहेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचे विनाकारण राजकारण केले जात आहे असंही त्यांनी यावेली सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपाल यांच्याकडून वारंवार अपमान केला जात होता. त्यावेळी हे भाजप आणि एकनाथ शिंदे शांत का बसले होते असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे.