उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार, आमदार रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

| Updated on: Jun 22, 2021 | 9:47 PM

उद्धव ठाकरेंचा विदेशात काळा पैसा असल्याचे माझ्याकडील पुरावे मी इडीला देणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. (Uddhav Thackeray Ravi Rana )

उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार, आमदार रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
रवी राणा उद्धव ठाकरे
Follow us on

नवी दिल्ली: बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंचा विदेशात काळा पैसा असल्याचे माझ्याकडील पुरावे मी इडीला देणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची कुठे कुठे किती प्रॉपर्टी त्याची यादी माझ्य़ाकडे आहे. ती यादी मी येणाऱ्या काळात ईडीला देणार असल्याचं रवी राणा म्हणाले आहेत. (Badnera MLA Ravi Rana said CM Uddhav Thackray black money proofs will gave to ED in future)

शिवसेना व उद्धव ठाकरेंवर राणा दाम्पत्याचा निशाणा

आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी यापूर्वी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांकडून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यावर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. लॉकडाऊनला प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे असं म्हणता येणाार नाही. ज्या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत, नियम पाळत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन अपेक्षितच आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर करताना सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणं सरकारचं कर्तव्य आहे. आधी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि आता फक्त ‘माझी जबाबदारी’ म्हणून सरकारला हात वर करता येणार नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती.

त्याचबरोबर नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने राणा यांनी दिलासा दिला आहे. असं असलं तरी आपल्याविरोधात राजकीय खिचडी शिजत आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्यामुळेच आपला आवाज दाबण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेवर केलाय.

संबंधित बातम्या:

नवनीत राणांना मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, राणा काय म्हणाल्या?

खासदारकीला धोका नाही, जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतरही नवनीत राणांना विश्वास

(Badnera MLA Ravi Rana said CM Uddhav Thackray black money proofs will gave to ED in future)