एमआयएम भाजपची बी टीम : बाळासाहेब थोरात

| Updated on: Feb 21, 2020 | 11:42 PM

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन एमआयएम पक्षाला दोषी ठरवत एमआयएम हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे.

एमआयएम भाजपची बी टीम : बाळासाहेब थोरात
Follow us on

पुणे : एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन एमआयएम पक्षाला दोषी ठरवत एमआयएम हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. एनआरसी आणि सीएएवरुन भाजपला समाजात विभाजन होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजप आणि एमआयएम नवीन खेळी खेळत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर सडकून टीका केली. “भाजपचे नेते वारंवार सरकारविरोधात बोलत आहेत. मात्र भाजपची ही पराभूत मानसिकता आहे. आपल्या पक्षातील आमदार टिकावे यासाठी ते सरकारविरोधात विधानं करत आहेत. निवडणुकीअगोदर ते पुन्हा येणार, असे नारे देत होते. मात्र ते पुन्हा आलेच नाहीत”, असा टोला बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी लगावला.

दरम्यान, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील महाविकास आघाडीत प्रवेश करतील, असं वक्तव्य ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीम यांनी केलं आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला असता, “लोकसभा निवडणुकीत भाजपची हवा आली होती. मात्र ही हवा विधानसभेत टिकली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काहीजण भाजपात गेले असून ते सध्या खूप अस्वस्थ आहेत. त्यामध्ये काही आमचे मित्र आहेत. मी त्या सर्वांना काही दिवस थांबा आणि अंतरंग पाहून घ्या, असा सल्ला दिला आहे”, असं थोरात म्हणाले.