मोठी बातमी! समीर मेघेंसह अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण, 32 जणांमध्ये कुणाकुणाचा समावेश?

| Updated on: Dec 26, 2021 | 9:09 PM

ज्या 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामध्ये किती आमदार आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मोठी बातमी! समीर मेघेंसह अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण, 32 जणांमध्ये कुणाकुणाचा समावेश?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : भाजप आमदार समीर मेघे (BJP MLA Sameer Meghe) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता विधानसभेतही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अधिवेशनातील (Assembly Election) तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार समीर मेघे यांनी काल फेसबुकवर पोस्ट करत स्वतःला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचा सल्लाही दिला होता. दरम्यान, आता अधिवेशनातीलच एकून 32 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

मेघेंवर नागपुरात उपचार सुरु

वाढत्या ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णसंख्येतच आता हिवाळी अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केलाय. कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती बिघडल्यानं समीर मेघे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळेच धास्तावले होते. तर दुसरीकडे आता अधिवेशनातीलच 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

32 जणांमध्ये कुणाकुणाचा समावेश?

दरम्यान, ज्या 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामध्ये किती आमदार आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मात्र सध्यातरी याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विधानसभा अधिवेशातील पोलीस, अधिवेशनातील कर्मचारी वर्ग यांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे.

उद्या अधिवेशनात काय होणार?

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा उद्या महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. दरम्यान, त्याआधीच गेल्या दोन दिवसांत विधानसभा अधिवेशनातील एका आमदारानंतर 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं आता अधिवेशनाचं काम कसं होतं, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळण्याचं आवाहान प्रशासनाकडून केलं जातंय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे विक्रमी रुग्ण आज आढळून आले आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत असल्यानंही चिंता व्यक्त केली जाते आहे.

संबंधित बातम्या –

Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात 922 नवे कोरोना रुग्ण, डिसेंबरमध्ये रुग्णसंख्येत सातत्याने वाढ, काळजी घेण्याचे आवाहन

Omicorn | महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा उच्चांक, मुंबईत सर्वाधिक रुग्ण, कुठे किती रुग्ण? वाचा सविस्तर

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचा मेगा प्लान; कधी, कुठे आणि किती जणांना मिळणार लस? वाचा सविस्तर