फुकटात मंत्रिपद मिळालेल्या आव्हाडांची उगाच वळवळ, कोणाची एजंटगिरी करताय? : निलेश राणे

| Updated on: Mar 27, 2021 | 10:32 AM

जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या संदर्भातला एकतरी पुरावा आहे का? काही आधार काय? असा सवाल नितेश राणेंनी विचारला. (Nilesh Rane Jitendra Awhad Rashmi Shukla)

फुकटात मंत्रिपद मिळालेल्या आव्हाडांची उगाच वळवळ, कोणाची एजंटगिरी करताय? : निलेश राणे
निलेश राणे जितेंद्र आव्हाड
Follow us on

रत्नागिरी : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटक प्रकरणावरून आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी घणाघाती आरोप केला आहे. मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन असलेली गाडी का उभी केली ते एनआयच्या तपासात पुढे येईल, हे प्रकरण शिजवत कोण होतं, याचे धागेदोरे कलानगरच्या बंगल्यापर्यत जातील, असं सांगत निलेश राणेंनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. फुकटात मंत्रिपद मिळालेल्या जितेंद्र आव्हाडांची (Jitendra Awhad) उगाच वळवळ सुरु आहे, ते कोणाची एजंटगिरी करतायत? असा सवालही त्यांनी विचारला. (BJP leader Nilesh Rane targets NCP MLA Jitendra Awhad allegation on Rashmi Shukla)

“जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का?”

दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत, असा आरोप करणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. जितेंद्र आव्हाड कुणाचे एजंट आहेत? जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का? घरात इंजिनिअरला खेचून आणत मारणारे हे मंत्री. तुम्ही महिलेवर आरोप करताय, तुमच्या आरोपाचा आधार काय? जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या संदर्भातला एकतरी पुरावा आहे का? काही आधार काय? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.

जितेंद्र आव्हाड कशामुळे हे बोलतात, तर त्यांना फुकटात मंत्रिपद मिळालंय, कुठेतरी आपली वळवळ असली पाहिजे, त्यासाठी जितेंद्र आव्हाडांचे हे प्रयत्न असल्याचा बोचरा वारही निलेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांवर केलाय.

जितेंद्र आव्हाडांचा आरोप काय ?

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या :

जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी रिपोर्ट तयार केला असावा, सीताराम कुंटेंनी फक्त सही केली: देवेंद्र फडणवीस

‘या’ आमदाराला रश्मी शुक्लांनी धमकावलं, जितेंद्र आव्हाडांनी आमदाराचं नावही सांगितलं!

(BJP leader Nilesh Rane targets NCP MLA Jitendra Awhad allegation on Rashmi Shukla)