…म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे, नितेश राणे ठाकरे सरकारवर कडाडले

मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. (Nitesh Rane On Karnataka to set up Maratha Development Board)

...म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे, नितेश राणे ठाकरे सरकारवर कडाडले
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 1:49 PM

मुंबई : कर्नाटकमध्ये मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या महामंडळाची घोषणा केली. या घोषणेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळाची स्थापन केली. पण महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. (Nitesh Rane On Karnataka to set up Maratha Development Board)

“कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, 50 हजार कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!!!” असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

मराठा समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी कर्नाटक सरकारकडून मराठा समाजासाठी महामंडळाची स्थापन करण्यात आली. या महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या महामंडळाची घोषणा केली. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षणाची सुनावणी आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग झाली आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्रीने मान्य करून सदरील प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. (Nitesh Rane On Karnataka to set up Maratha Development Board)

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस

मोठी बातमी: मराठा आरक्षणावरुन आंदोलक आक्रमक; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.