हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये भाजपचं काय चुकलं?

| Updated on: Dec 23, 2019 | 8:27 PM

झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास हाती आले आहेत (Jharkhand Assembly Election Results 2019). आतापर्यंत आलेल्या निकालांवरुन भाजप आणखी एक राज्य गमवल्याचं स्पष्ट झालं आहे.

हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये भाजपचं काय चुकलं?
Follow us on

Jharkhand Assembly Election Results 2019 रांची : झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास हाती आले आहेत (Jharkhand Assembly Election Results 2019). आतापर्यंत आलेल्या निकालांवरुन भाजप आणखी एक राज्य गमवल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला, केंद्रात सरकार स्थापन केली. लोकसभा निवडणुकांनंतर झारखंड हे तिसरे राज्य आहे जिथे विधानसभा निवडणुका पार पडल्या (Jharkhand Assembly Election Results 2019). यापूर्वी हरियाणामध्ये (Haryana Assembly Elections) झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं मात्र तिथे त्यांना जेजेपीसोबत युती करावी लागली. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं (Maharashtra Assembly Election Results). त्यानंतर आता झारखंडही भाजपच्या हातातून निसटलं आहे.

हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये भाजपचं काय चुकलं?

लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत पाहिलं, तर एक गोष्ट या तीनही राज्यांमध्ये समान आहे. ज्या राज्यात जी वोट बँक निर्णायक आहे, ती साधण्यात भाजपला अपयश आलं. भाजपने तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जो चेहरा दिला, तो त्या राज्यातील सर्वाधिक वोट बँक असलेल्या समाजातील नव्हता. भाजपने हरियाणात जाट समाजाचे नसलेले मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar), महाराष्ट्रात मराठा नसलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि झारखंडमध्ये आदिवासी नसलेले रघुवर दास (Raghubar Das) यांना मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून निवडलं.

महाराष्ट्रात गैर मराठा

महाराष्ट्रात भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा समाजाचा चेहरा न देता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार निवडलं. सरकारचं पाच वर्षातील काम आणि फडणवीस यांची प्रतिमा यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं. मात्र, निवडणुकांनंतर सर्व चित्रच बदललं. शिवसेना आणि भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन तेढ निर्माण झाला आणि त्यानंतर या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी वाढतच गेली. अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि भाजपला विरोधीपक्षात बसावं लागलं.

झारखंमध्ये गैर आदिवासी मुख्यमंत्री

झारखंडमध्ये आदिवासी वोट नेहमी निर्णायक ठरले आहेत. गेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कुठला चेहरा घोषित केला नव्हता. निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने आदिवासी नसलेल्या रघुवर दास यांना मुख्यमंत्री बनवलं. मात्र, यंदाच्या निवडणुकांमध्येही भाजपने रघुवर दास यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवलं. दुसरीकडे, जेएसएसने आदिवासी समाजातील हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचं दावेदार सांगितलं. हेमंत यांचे वडील शिबू सोरेन हे देखील झारखंडचे बडे आदिवासी नेते आहेत.

जेएमएमने रघुवर दास यांच्यावर निशाणा साधत एक गैर आदिवासी नेता कधीही आदिवासी लोकांचं दु:ख समजून घेऊ शकत नाही, असं म्हणत प्रचार केला.

हरियाणात गैर जाट मुख्यमंत्री

हरियाणामध्ये जाट समाज निर्णायक वोट बँक आहे. इथेही भाजपने जाट समाजाच्या विरोधाला न जुमानता जाट नसलेले मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित केला. अखेर हरियाणात भाजपला जाट समाजाच्या नाराजीला सामोरे जावं लागलं. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या 40 च्या वर पोहोचू शकली नाही. त्यानंतर जननायक जनता पक्षाच्या पांठिब्यानंतर भाजपने हरियाणात सत्ता स्थापन केली.

Jharkhand Assembly Election Results 2019