AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित बाळा तुझ्या काकाने…भाजपाच्या आमदाराची रोहित पवारांवर एकेरी भाषेत टीका, पवार कुटुंबाचंही नाव घेतलं!

रोहित पवार सध्या चांगलेच सक्रीय आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ते करत आहेत. दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही ते सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसतायत.

रोहित बाळा तुझ्या काकाने...भाजपाच्या आमदाराची रोहित पवारांवर एकेरी भाषेत टीका, पवार कुटुंबाचंही नाव घेतलं!
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 6:15 PM
Share

Rohit Pawar Vs Rajendra Raut : दुष्काळामुळे महाराष्ट्र होरपळला आहे. मराठवाडा तसेच विदर्भात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झालेय. पावसाळा संपलेला नसताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. सध्या राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. या घोषणेअंतर्गत सरकारकडून काही उपायोजना केल्या जातायत. दरम्यान, एकीकडे दुष्काळामुळे जनता होरपळलेली असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणही तापू लागलंय. भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. विशेष म्हणजे ही टीका करताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर एकेरी टीका केली.

अरे रोहित बाळा तुझ्या काकाने…

भाजपचे विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. ‘अरे रोहित बाळा तुझ्या काकाने सांगितलं होतं थोडक्यात हुकला. उपटसुंब्या कोणाला म्हणतो तूच आजोबाच्या जीवाववर उपटसुंब्या आहेस,’ अशी बोचरी टीका राजेंद्र राऊत यांनी केली. तसेच दुष्काळात आमचा मतदारसंघ सांभाळायला मी आणि माझे नेते देवेंद्र फडणवीस सक्षम आहोत, असा सल्लाही त्यांनी रोहित पवारांना दिला.

तुमच्या खानदानाचे काळे धंदे बाहेर निघू लागले की…

माझ्या मतदारसंघात येण्याच्या गोष्टी करू नको. तुझ्या कर्जतमध्ये येऊन मी काय करणार आहे हे बघून घे, असा इशाराही राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांना दिला. तसेच आयुष्यात बेडकासारख्या उड्या कोणी मारल्या यासंदर्भात आजोबांकडून माहिती घेऊन आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही दिला. आम्ही संप्रदायतील माणसं आहोत, रात्रीचे काळे धंदे कोणाचे आहेत राज्याला माहिती आहेत. तुमच्या खानदानाचे काळे धंदे बाहेर निघू लागले की तोंड लपवून बसू, नको एवढीच विनंती आहे, अशी बोचरी टीकाही राजेंद्र राऊत यांनी केली.

रोहित पवार नेमकं काय उत्तर देणार?

दरम्यान, रोहित पवार सध्या चांगलेच सक्रीय आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ते करत आहेत. दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही ते सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसतायत. असे असताना आता राजेंद्र राऊत यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...