“महाविकासआघाडीचे नेते फक्त पैसा कमवायच्या मागे, उद्धव ठाकरे कशातच लक्ष घालत नाहीत”

| Updated on: Mar 31, 2021 | 3:23 PM

ही शरमेची गोष्ट आहे, असेही रणजित नाईक निंबाळकर म्हणाले. (MP Ranjeet Singh Naik Nimbalkar Criticizes Thackeray Government)

महाविकासआघाडीचे नेते फक्त पैसा कमवायच्या मागे, उद्धव ठाकरे कशातच लक्ष घालत नाहीत
Shivsena Bjp
Follow us on

सातारा : “महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे सरकार हे पैसे कमविण्याच्या हेतूने एकत्र आले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. पण कोरोना आटोक्यात आणण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” अशी टीका माढा लोकसभेचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केली आहे. (MP Ranjeet Singh Naik Nimbalkar Criticizes Thackeray Government)

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कोरोनामुळे लोकांकडे पैसे नसताना सरकारने वीजबील भरण्याचा तगादा जनतेकडे लावला आहे. वीजबिल भरत नाही म्हणून वीज कनेक्शन तोडले जात आहेत. ही शरमेची गोष्ट आहे, असेही रणजित नाईक निंबाळकर म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे लवकरच अंतर्गत कुरघोड्यांमुळे हे सरकार पायउतार होईल, अशी खरमरीत टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

गेल्या 24 तासांत 27 हजार 918 नवे रुग्ण 

राज्यात गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येत काल काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 27 हजार 918 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 23 हजार 820 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3 लाख 40 हजार 542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नव्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 27 लाख 73 हजार 436 वर पोहोचली आहे. त्यापैकी 23 लाख 77 हजार 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यातील आतापर्यंत 54 हजार 422 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (MP Ranjeet Singh Naik Nimbalkar Criticizes Thackeray Government)

मुंबईतील कोरोना स्थिती 

मुंबईत गेल्या 24 तासांत 4 हजार 758 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 6 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता थेट 50 दिवसांवर आला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती 

पुण्यात काल दिवसभहात 3 हजार 226 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 3 हजार 268 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात काल दिवसभरात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 32 हजार 806 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 725 रुग्ण गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

नव्या आकडेवारीसह पुण्यातील रुग्णसंख्येचा आकडा 2 लाख 64 हजार 885 वर पोहोचलाय. त्यातील 2 लाख 26 हजार 809 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 5 हजार 270 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (MP Ranjeet Singh Naik Nimbalkar Criticizes Thackeray Government)

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण संकट मात्र कायम

मुंबईला कोरोनाचा विळखा, सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या घटवली

 शरद पवारांवर 8-10 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया होणार, राजेश टोपे यांची माहिती