मुंबईला कोरोनाचा विळखा, सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या घटवली

पुढील आदेशापर्यंत कुणीही मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आदेश मंदिरी समितीने दिले आहेत. (Siddhivinayak Temple Devotees Limit) 

मुंबईला कोरोनाचा विळखा, सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या घटवली
Siddhivinayak Temple

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या घटवण्यात आली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत कुणीही मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आदेश देण्यात आले आहे. (Mumbai Siddhivinayak Temple Devotees Limit Reduce)

सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आजपासून पुढील आदेशापर्यंत सिद्धिविनायक मंदिर काही ठराविक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. यासाठी भाविकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन बुकिंगद्वारे केवळ दर तासाला 50 भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत कुणीही मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आदेश मंदिरी समितीने दिले आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईत गेल्या 24 तासांत 4 हजार 758 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 6 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता थेट 50 दिवसांवर आला आहे. (Mumbai Siddhivinayak Temple Devotees Limit Reduce)

अष्टविनायकातील तीन मंदिर बंद

तर दुसरीकडे आज संकष्टी चतुर्थी आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतांश गणपती मंदिरात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर आज काही मंदिर दर्शनासाठी बंद ठेवली जाणार आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध अष्टविनायकातील ओझर आणि लेण्याद्री हे दोन्ही गणपती मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.  तहसीलदारांच्या आदेशाने हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश भक्तांनी घरातूनच ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अष्टविनायकपैकी एक असलेल्या रांजणगाव महागणपती मंदिर संकष्टी चतुर्थीनिमित्त बंद ठेवले जाणार आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असतात. या गर्दीतून कोरोनाचा समुहसंसर्ग होण्याची भिती असल्याने वर्तवली जात आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गणपतीपुळे मंदिराकडे भाविकांची पाठ 

तर रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात भाविकांचा ओघ कमी पाहायला मिळत आहे. संकष्टी चतुर्थी दिवशी अनेक भाविक गणपती मंदिरात गर्दी करत असतात. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर मंदिर खुलं असून देखील भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी आहे. सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून मंदिर प्रशासनाकडून दर्शन दिलं जात आहे. वाढता कोरोना आणि संचारबंदीच्या पाश्वभूमीवर भाविकांनी गणपतीपुळ्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. (Mumbai Siddhivinayak Temple Devotees Limit Reduce)

संबंधित बातम्या : 

‘पवारसाहेबांच्या’ प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांकडून देव पाण्यात, मुंबईत होमहवन, पुण्यात विठ्ठलपूजा

Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला काहीसा दिलासा, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण संकट मात्र कायम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI