AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेच्या आमदारांना ज्या हॉटेलात ठेवलं, तिथेच भाजपच्या उमेदवाराचा मुक्काम; रात्री ट्रायडंटमध्ये नेमकं काय घडलं?

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेने आमदारांना ज्या ट्रायडेंट हॉटेलला ठेवले आहेत, त्या हॉटेलमध्ये भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक आल्याने सगळ्यांच्या उंचावल्या भुवया आहेत.

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेच्या आमदारांना ज्या हॉटेलात ठेवलं, तिथेच भाजपच्या उमेदवाराचा मुक्काम; रात्री ट्रायडंटमध्ये नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या आमदारांना ज्या हॉटेलात ठेवलं, तिथेच भाजपच्या उमेदवाराचा मुक्कामImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 09, 2022 | 2:15 PM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha elections) अवघा एक दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. काही घडामोडी अपेक्षित आहेत. तर काही घडामोडी अनपेक्षित आहेत. शिवसेनेने आमदारांना ज्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं, त्याच हॉटेलात भाजपचे (bjp) राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) उतरले आहेत. भाजपकडून आमदारांना संपर्क साधला जाऊ नये आणि आपले आमदार फोडू नयेत म्हणून भाजपने या आमदारांना ट्रायडंटमध्ये ठेवलं होतं. पण तिथे खुद्द भाजपचे राज्यसभेचे उमेदवारच तळ ठोकून असल्याने शिवसेनेच्या तंबूत खळबळ उडाली आहे. धनंजय महाडिक काल या हॉटेलात रात्री मुक्कामी होते. त्यामुळे रात्रभरात काय घडले यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाडिक यांनी शिवसेनेच्या आमदारांना संपर्क साधला का? अशी चर्चाही यावेळी रंगली आहे. मात्र, महाडिक यांच्याकडून कोणत्याही भेटीगाठीबाबत काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही.

शिवसेनेने आमदारांना ज्या ट्रायडेंट हॉटेलला ठेवले आहेत, त्या हॉटेलमध्ये भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक आल्याने सगळ्यांच्या उंचावल्या भुवया आहेत. जिथे शिवसेना नेत्यांचा मुक्काम तिथेच धनंजय महाडिक यांचाही मुक्काम असल्याने वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. महाडिक रात्री याच हॉटेलात मुक्कामी होते. त्यामुळे महाडिक यांनी शिवसेना आमदारांशी काही बातचीत केलीय का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

रडारवर कोण? अपक्ष की शिवसेनेचे आमदार

महाडिक या हॉटेलात मुक्कामी असल्याने अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत. भाजपच्या रडारवर नेमकं कोण आहे? शिवसेनेचे आमदार की अपक्ष आमदार? अशी चर्चाही रंगली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत नेमके कोणते आमदार फुटणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

आदित्य ठाकरे, राऊत ट्रायडंट

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे आज ट्रायडंटमध्येच दिवसभर राहणार आहेत. हे दोन्ही नेते आमदारांची भेट घेऊन त्यांना काही सूचना देणार आहेत. या हॉटेलमध्ये भाजपकडून आमदारांना कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ नये म्हणून हे दोन्ही नेते हॉटेलात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे दोन्ही नेते किती वाजेपर्यंत हॉटेलात असतील हे कळू शकलं नाही.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार