बाळासाहेबांची शिवसेना आता मनसेच्या रुपाने पुढे : राम कदम

राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी," अशी मागणीही राम कदम यांनी केली (Ram kadam on MNS poster) आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आता मनसेच्या रुपाने पुढे : राम कदम
ram kadam
| Updated on: Feb 04, 2020 | 4:07 PM

मुंबई : मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर लावण्यात (Ram kadam on MNS poster) आलं आहे. या पोस्टरमध्ये वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा’ असं पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आलं आहे. यावरुन भाजप नेते राम कदम यांनी मनसेची पाठराखण करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच आपल्या भाषणात बांग्लादेशी लोकांना हाकलून द्या असं म्हणत होते. जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती. ती आता मनसेच्या रुपाने पुढे येत आहे. शिवसेना सत्तेत असल्याने याचा विरोध करणार नाही. त्यांच्यावर काँग्रेसचा दबाव आहे,” अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली.

तसेच “देशाच्या विरोधात घोषणा करणं हे लाजिरवाणं आहे. आम्ही त्यांचा विरोध केल्यानंतर राज्य सरकार झुकलं. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी,” अशी मागणीही राम कदम यांनी केली (Ram kadam on MNS poster) आहे.

बांगलादेशी घुसखोरांनो तुमच्या देशात निघून जा, पोस्टरमधून ‘मनसे’ इशारा

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चाची ‘मोर्चेबांधणी’ही चांगलीच सुरु केली आहे. याबाबत वर्सोवामध्ये पोस्टरही लावलं आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केलं (Ram kadam on MNS poster) होतं.

संबंधित बातम्या : 

दीड मिनिटांच्या भाषणात राज म्हणाले, “मी ग्रॅज्युएट नाही, मला आजपर्यंत कुणी डिग्रीबद्दल विचारलंही नाही”