भाजप नेत्या मेधा कुलकर्णी राज ठाकरेंच्या भेटीला

| Updated on: Nov 05, 2019 | 3:45 PM

कोथरुडच्या भाजपच्या मावळत्या आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni meet Raj Thackeray) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

भाजप नेत्या मेधा कुलकर्णी राज ठाकरेंच्या भेटीला
Follow us on

पुणे : कोथरुडच्या भाजपच्या मावळत्या आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni meet Raj Thackeray) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजपने मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni meet Raj Thackeray)  यांचं तिकीट कापून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिलं. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच मेधा कुलकर्णी यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र मेधा कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट ही राजकीय नाही, तर मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी होती.

मेधा कुलकर्णी यांनी निवडणुकीच्या आधीही राज ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, आज त्यांनी मुलीच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले.

मेधा कुलकर्णी आज मुंबईत आहेत. त्यांचा पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही. केवळ निमंत्रण देण्यासाठीच आज त्या मुंबईत आल्या आहेत. त्यांच्या मुलीचं लग्न असल्याने त्याचं निमंत्रण त्यांनी राज ठाकरे यांना दिलं.

मेधा कुलकर्णी कोण आहेत?

मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं.

2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता.

यंदा मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला होता. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात (Chandrakant Patil Kothrud) इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही. भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही, तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला होता.

मात्र मेधा कुलकर्णी यांनी स्वत: प्रचारात सहभाग घेऊन, चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला.