भाजपची मोठी खेळी, मनसे नेते बाळा नांदगावकरांना विधानपरिषदेवर पाठवणार?

| Updated on: Mar 11, 2020 | 5:55 PM

राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांना, भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपची मोठी खेळी, मनसे नेते बाळा नांदगावकरांना विधानपरिषदेवर पाठवणार?
Follow us on

मुंबई : भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढली असताना, मोठी राजकीय (Bala Nandgaonkar Vidhan parishad BJP ) घडामोड घडत आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांना, भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकतंच भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अनेक भेटीगाठी सुरु आहेत. त्यातून हा पर्याय समोर आला की काय याबाबत राजकीय वर्तुळात तर्क लढवले जात आहेत. (Bala Nandgaonkar Vidhan parishad BJP )

बाळा नांदगावकर हे मनसेचे महत्त्वाचे नेते आणि राज ठाकरे यांचा उजवा हात समजले जातात. राज ठाकरे यांची अनेकांनी साथ सोडली, मात्र बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यामुळेच बाळा नांदगावकर यांना विधानपरिषदेवर पाठवून, मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपला एकअर्थी मित्रपक्षाची गरज आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेला सततच्या पराभवामुळे पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी मदतीचा हात आवश्यक आहे. त्यातूनच मनसे-भाजप युती अस्तित्वात येताना दिसत आहे.

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीची समीकरणं जुळवण्यासाठी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अनेकदा चर्चा झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्याचा पुढचा भाग म्हणून बाळा नांदगावकर यांना विधानपरिषदेवर पाठवून भाजप नवी खेळी करु शकते.

आशिष शेलार एक तास ‘कृष्णकुंज’वर, 20 दिवसांत चौथ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते (Raj Thackeray-Ashish Shelar Meet) आशिष शेलार यांच्यात पुन्हा खलबतं झाल्याचं पाहायला मिळालं. आशिष शेलार हे 8 मार्चला सकाळी एक तास ‘कृष्णकुंज’वर (KrushnaKunj) होते. आशिष शेलार  सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत ‘कृष्णकुंज’वर होते.

गेल्या 20 दिवसांत आशिष शेलार हे चौथ्यांदा (Raj Thackeray-Ashish Shelar Meet) राज ठाकरे यांच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर पोहोचले. त्यामुळे राजकीय गल्लीबोळांत मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाणं आलं आहे.