आधी स्वत: देवेंद्र फडणवीस, आता आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप आमदार  आशिष शेलार (Aashish Shelar meet Raj Thackeray) यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली.

आधी स्वत: देवेंद्र फडणवीस, आता आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jan 30, 2020 | 2:47 PM

मुंबई : भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप आमदार  आशिष शेलार (Aashish Shelar meet Raj Thackeray) यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर (Aashish Shelar meet Raj Thackeray)  जाऊन भेट घेतली. काल संध्याकाळी 7 वाजता ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात तासभर खलबते झाली. मनसे 9 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढत आहे. त्या अनुषंगाने या दोघांमध्ये चर्चा झाल्याची चिन्हं आहेत. काल सायंकाळी 7 वाजता आशिष शेलार ‘कृष्णकुंज’वर आले होते. त्यावेळी सुमारे 1 तास राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची बैठक झाली.

मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावरुन वाटचाल सुरु केल्याने, भाजपशी जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली होती.

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट

या महिन्याच्या सुरुवातीला 7 जानेवारीला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली होती. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास 1 ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.

मनसे हिंदुत्वाच्या दिशेने? 

मनसेने आपल्या पहिल्या महाअधिवेशनात झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. मनसेने भगव्या रंगाचा नवा झेंडा स्वीकारला आहे. शिवाय राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका पहिल्यापासूनच असल्याचं म्हटलं होतं.  याअगोदर महाराष्ट्रात शिवसेनेकडे कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहिले जात होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे निर्माण झालेला स्पेस भरुन काढण्यासाठी मनसे भाजपची साथ देऊन हिंदुत्वाच्या मुद्दावर ही नवी युती होऊ शकते.

संबंधित बातम्या  

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.