ना काळा शर्ट, ना रुमाल, हद्द म्हणजे मोदींच्या नगरमधील सभेत काळी बनियनही बॅन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. सुजय विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेआधी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जो कोणी सभेला काळे कपडे घालून येत होता, त्याला सभास्थळी […]

ना काळा शर्ट, ना रुमाल, हद्द म्हणजे मोदींच्या नगरमधील सभेत काळी बनियनही बॅन
Follow us on

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. सुजय विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेआधी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जो कोणी सभेला काळे कपडे घालून येत होता, त्याला सभास्थळी प्रवेश दिला जात नव्हता. इतकंच नाही तर खिशात काळ्या रंगाचा रुमाल तर नाही ना हे सुद्धा तपासलं जात होतं. त्यापेक्षा हद्द म्हणजे काळ्या रंगाची बनियनवरही बंदी घालण्यात आली. काळ्या कपड्यांवर बंदी का असा सवाल तर आहेच, पण काळी बनियनही काढायला लावणं हे म्हणजे सुरक्षेच्या नावावर अघोरी प्रकार म्हणावा लागेल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगरमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राम शिंदे, सुजय विखे पाटील आणि सदाशिवराव लोखंडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मोदींनी काँग्रेससह राष्ट्रवादीवर हल्ला चढवला.

मोदींचा शरद पवारांवर हल्ला
दरम्यान, या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. काँग्रेसशी फारकत घेऊन वेगळे झालेले शरद पवार हे पुन्हा त्यांच्यासोबत आहेत. मात्र ते भारताकडे विदेशी चष्म्यातून बघत आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी आहे. हे नावही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे का. तुमचे सहकारी जाहीरपणे भारतात दोन पंतप्रधान करण्याच्या बाता करत आहेत. छत्रपतींच्या भूमितील असलेल्या शरद पवारांना झोप कशी येते?, असा सवाल मोदींनी केला.

शरद पवारांनी देशाच्या नावे काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधानाच्या बाता केल्या जात आहेत, शरद पवार कधीपर्यंत गप्प राहणार, अशीही विचारणा मोदींनी केली.

संबंधित बातम्या 

LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने नगरकडे रवाना   

मोदींची नगरमध्ये सभा, विखेंचा भाजप प्रवेश?