Shiv sena Dussehra Melawa : ब्रेकिंग! शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळणार नाही?

| Updated on: Sep 17, 2022 | 10:04 AM

Shivaji Park Dussehra Melawa : बीएमसीच्या जी उत्तर विभागानं विधी विभागाचा अभिप्राय मागवल आहे, अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. दरम्यान, आता शिवाजी पार्कवर दसार मेळाव्याला कुणाचीच परवानगी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जातेय.

Shiv sena Dussehra Melawa : ब्रेकिंग! शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळणार नाही?
मोठी बातमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यंदा दसरा मेळावा (Dussehra Melawa) कुणाचा होणार, यावरुन राजकारण तापलं आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेनेला (Shiv sena News) शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याची की नाही, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. कारण बीएमसीच्या जी उत्तर विभागानं विधी विभागाचा अभिप्राय मागवला आहे, अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. दरम्यान, आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला कुणालाच परवानगी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जातेय.

ठाकरे शिवाजी पार्कसाठी आग्रही

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्कवर विजयादशमीला दसरा मेळावा शिवसेनेच्या वतीने घेतला जातो. दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष अनेक निर्बंध सगळ्याच गोष्टीवर आले होते. पण यंदा कोरोनाचं संकट काहीस शमलंय. सर्व गोष्टी पूर्ण क्षमतेनं पुन्हा सुरु झाल्यात. अशातच यंदाचा दसरा मेळावा दणक्यात घेण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.ट

हे सुद्धा वाचा

खरी शिवसेना कुणाची?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न उपस्थित झालाय. राजकीय भूकंपात आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. शिंदे गटानेही दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे.

सुरुवातीला शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्नशील होते. पण अखेर राजकीय स्पर्धा पाहता शिवसेना मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानाचा पर्यायही तपासल्याची माहिती समोर आली होती. तसे प्रयत्नही त्यांनी सुरु केले होते.

कुणाला परवानगी मिळणार?

दरम्यान, सुरुवातीला दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता ठाकरेंना शिवाजी पार्क हे मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळेल, असं सांगितलं जात होतं. पण शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठीची परवानगी अद्याप कुणालाही देण्यात आलेली नाही. अशातच बीएमसीकडून अहवाल मागवण्यात आलाय. या अहवालातून आता पुढे नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचंय.