बैलगाडा शर्यतीबाबत आता शिवसेना नेत्याचाच इशारा! गृहमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम

| Updated on: Aug 21, 2021 | 8:25 PM

माजी खासदार शिवाजीराव-आढळराव पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. आढळराव पाटील यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर इशारा दिला आहे. गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होणारच असं आढळराव पाटील म्हणाले. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय.

बैलगाडा शर्यतीबाबत आता शिवसेना नेत्याचाच इशारा! गृहमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना
Follow us on

पुणे : बैलगाडा शर्यतीवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली पोलिसांना गुंगारा देत गनिमीकाव्यानं बैलगाडा शर्यत भरवून दाखवली. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव-आढळराव पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. आढळराव पाटील यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर इशारा दिला आहे. गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होणारच असं आढळराव पाटील म्हणाले. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. महत्वाची बाब म्हणजे आढळराव पाटील यांनी गृहमंत्री उपस्थित असलेल्या व्यासपीठावरुनच हे आव्हान दिलं आहे. (Shivajirao Adlrao Patil warns the state government about the bullock cart race)

गृहमंत्र्यांचा बैलगाडा मालकांना दिलासा

दुसरीकडे बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी वळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना अजून एक आवाहन केलं आहे. पुढे खटले दाखल होणार नाही म्हणून बैलगाडा शर्यत भरवू नका, असं वळसे पाटील म्हणाले. ते आज आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयातील नव्या सुविधांच्या लोकार्पणावेळी बोलत होते.

पडळकरांनी स्पर्धा भरवली, आता गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीला घेऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकर काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. काहीही झाले तरी शर्यत घेणारच असा निश्चय पडळकर यांनी केला होता. नंतर पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या प्रकारानंतर आता सांगलीतील प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे. पडळकर यांच्यावर जिल्हाधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. पडळकर तसेच इतर 41 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिदादांचा पडळकरांवर नाव न घेता निशाणा

“बैलगाडा शर्यत केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला प्रश्न आहे. संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंट करतात त्यांचंच मागच्या पाच वर्षात सरकार होतं. त्यांना कोणीही अडवलं नव्हतं. आताही केंद्रात त्यांचंच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे. आम्ही लोकांचं भलं करतोय असं दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे”, अशा शब्दात अजितदादांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता निशाणा साधला.

इतर बातम्या :

आधी गोपीचंद पडळकरांनी करुन दाखवलं, आता सरकार अ‌ॅक्शन मोडमध्ये, बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे गुन्हा दाखल

गोपीचंद पडळकरांच्या बैलगाडा शर्यतीत ‘सागर-सुंदर’ 1 नंबर, बक्षीसाची रक्कम किती?

Shivajirao Adlrao Patil warns the state government about the bullock cart race