शिरसाट काहीही बोलतो, सत्तार उड्या मारतो..चंद्रकांत खैरे का संतापले ? संभाजीनगरातील राजकारण तापले…

लाडकी बहिण योजनेचा ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागातून निधी वितरित करण्यात आला आहे. त्यावरुन संजय शिरसाट यांच्यावर चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे.

शिरसाट काहीही बोलतो,  सत्तार उड्या मारतो..चंद्रकांत खैरे का संतापले ? संभाजीनगरातील राजकारण तापले...
chandrakant khaire and sanjay shirsath
| Updated on: Sep 27, 2026 | 5:52 PM

लाडकी बहिण योजनेच्या ऑगस्टचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत करण्यात आल्याची माहीती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळण्यासाठी ही तरतूद केल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपणार असून लवकरच त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पडणार आहेत. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहिण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्यांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 रुपये वितरित झाल्याची माहिती टीव्ही ९ मराठी चॅनलला दिली आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून पैसे वर्ग केले, मग आधी कुठे टाकले होते असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की संजय शिरसाट काहीही बोलत असतो. त्यांना म्हणा बडबड करु नका, जरा शांत बसा. त्यात सत्तार उड्या मारतो असेही शिरसाट यावेळी म्हणाले. अब्दुल सत्तार हा काहीही करु शकतो. तो काँग्रसमध्ये जाणार आहे. यासाठी त्याच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहे असाही आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

विरोधकांनो राजकारण थांबवा – संजय शिरसाट

तत्पूर्वी, मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीची नेते दुष्काळग्रस्त भागात दौरे कशाला करत आहेत असा सवाल केला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, सरकारला काळजी आहे. आता तुम्ही तुमच्या पार्टीच्या विकासासाठी दौरे करत आहात. तुम्हाला दौरा करायचा असेल तर त्याऐवजी मदत करा. सरकारला मदत करा. सरकारने दुष्काळ जाहीर केला असल्याने तुम्ही आता तुमच्या राजकारणाची पोळी भाजणे थांबवा असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. सरकारने लाडकी बहिण योजनेचा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी सामाजिक कल्याण विभागाचे 339 कोटी रुपयांचा निधी वळता केल्याचे सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us