चंद्रशेखर आजाद यांची निवडणुकीतून माघार, काँग्रेसला पाठिंबा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

वाराणसी : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून मैदानात उतरलेल्या भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भीम आर्मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे वाराणसीतील दलित मतांची विभागणी होत होती. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे असे चंद्रशेखर आजाद यांनी जाहीर केले आहे. वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी […]

चंद्रशेखर आजाद यांची निवडणुकीतून माघार, काँग्रेसला पाठिंबा
Follow us on

वाराणसी : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून मैदानात उतरलेल्या भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भीम आर्मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे वाराणसीतील दलित मतांची विभागणी होत होती. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे असे चंद्रशेखर आजाद यांनी जाहीर केले आहे.

वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनीही वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र आज बुधवारी त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

भीम आर्मीने वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करताच अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. मात्र याचा फायदा काही विरोधीपक्ष घेत असल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच भीम आर्मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने वाराणसीतील दलित मतांची विभागणी होत आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत आहे. असे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी सांगितले. तसेच निवडणुकीत भीम आर्मीने काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांनी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला नसल्याचे जाहीर केले आहे.

तसेच येत्या काही दिवसात चंद्रशेखर आजाद दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटण्यास दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत भीम आर्मीकडून आम आदमी पार्टीला (आप) पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान येत्या 26 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर भाजप नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींचा अर्ज दाखल करतेवेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी तमिळनाडूतील काही शेतकरीही नरेंद्र मोदींच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यादेखील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाराणसी लोकसभा मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे.