किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल : अतुल लोंढे

| Updated on: Nov 08, 2021 | 6:28 PM

सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरू असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दीडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करण्यात आलाय, असंही लोढे म्हणालेत. 

किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल : अतुल लोंढे
atul londhe
Follow us on

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल आणि बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्याविरोधात नागपूर कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केलीय.

सतत खोट्या आरोपांची राळ उडवत नेत्यांना बदनाम करण्याचे काम

पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करीत आहेत. स्वतःच तपास अधिकारी आणि स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील 40 टक्के शिवसेना, 40 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व 20 टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली. किरीट सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात अतुल लोंढे यांनी आज नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली.

एक रुपयाचा दावा दाखल

सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरू असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दीडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करण्यात आलाय, असंही लोढे म्हणालेत.

माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा

किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी बदनामे करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढेंनी न्यायालयात केलीय. एका टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर सुलीचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी, असेही लोंढे म्हणाले होते. या संदर्भातील पुरावा व्हिडीओ पुरावा पोलीस आयुक्तांना दिल्याचं त्यांनी सांगितले. काँग्नेसनं ॲड. सतीश उके यांची वकील म्हणून नेमणूक केली.

संबंधित बातम्या

ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड समीर वानखेडेच, अटक करून चौकशी करा; काँग्रेसची जोरदार मागणी

परमबीर सिंग गायब, ईडीकडून अनिल देशमुखांना अटक, कितीही प्रयत्न करा, मविआ सरकार पडणार नाही : नाना पटोले