परमबीर सिंग गायब, ईडीकडून अनिल देशमुखांना अटक, कितीही प्रयत्न करा, मविआ सरकार पडणार नाही : नाना पटोले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी मध्यरात्री अटक केली. देशमुख यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशमुख यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत भाजपवर शरसंधान साधलं आहे.

परमबीर सिंग गायब, ईडीकडून अनिल देशमुखांना अटक, कितीही प्रयत्न करा, मविआ सरकार पडणार नाही : नाना पटोले
nana patole

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी मध्यरात्री अटक केली. देशमुख यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशमुख यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत भाजपवर शरसंधान साधलं आहे. नेत्यांना अटक करुन सरकार पाडता येईल, या गैरसमजात भाजपवाले आहेत. पण मला त्यांना सांगायचंय, तुम्ही कितीही प्रयत्न करा, महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही, असं नाना पटोले यांनी ठासून सांगितलं.

आघाडी  सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान

“केंद्रातील भाजपचं सरकार सर्वच क्षेत्रात नापास झालंय. त्यामुळे या अपयशाला बगल देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातंय. ज्यांनी आरोप केले ते परमवीर सिंग गायब आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, अजित पवारांसंबंधी संपत्तीच्या अफवा ही भाजपकडून मुद्दामून सगळं सुरु आहे. पण यामुळे सरकार आणखी मजबूत होईल” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

अनिल देशमुख यांच्या प्रकरणात काहीही निष्पन्न होणार नाही. बरं ज्यांनी आरोप केले ते तरी जागेवर असायला हवे होते. असं नाना पटोले म्हणाले. त्यांनी देशमुख प्रकरणात कितीही थयथयाट केला तरी त्यांच्या हातात काहीच लागणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी

अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी विचारला.

गेल्या अनेक काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी होतोय. हे आपण पाहिलं आहे. एखादा व्यक्ती चौकशी यंत्रणांना सहकार्य करत करताना देखील अटकेची कारवाई करणं, हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.

मलिक पुराव्यानिशी बोलून विरोधकांची बोलती बंद करतात

राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु असून त्या निमित्ताने राजकीय धुरळाही उडाला आहे. याच राजकीय धुराळ्यावर रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “फडणवीस-मलिक वादाबद्दल माहिती नाही पण ते पुराव्यानिशी बोलून विरोधकांची बोलती बंद करतात. ते पुरावे असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाहीत.”

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका, अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार; आयकर विभागाची नोटीस

फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय? नवाब मलिक भाजप नेत्यांवर भडकले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI