‘किरीट भाई की दया से सब बढिया है’; व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपच्या ‘अच्छे दिना’वरुन राष्ट्रवादीचा टोला

| Updated on: Sep 17, 2021 | 2:55 PM

'किरीट भाई की दया से सब बढिया है' अशा आशयाचे व्यंगचित्र काढत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपवर टिकेचा बाण सोडला आहे. क्लाईन क्रास्टो हे व्यंगचित्राच्या माध्यमातून अनेकदा भाजपवर खोचक टीका करत असतात.

किरीट भाई की दया से सब बढिया है; व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपच्या अच्छे दिनावरुन राष्ट्रवादीचा टोला
Clyde Castro Cartoon
Follow us on

मुंबई : भाजपमुळे बेरोजगारीने हैराण झालेल्या लोकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहे का, असा प्रत्यय किरीट सोमय्या यांचा स्थानिक झेरॉक्सचा व्यवसाय करणार्‍यांना सध्या आलाय. कारण ‘किरीट भाई की दया से सब बढिया है’ अशा आशयाचे व्यंगचित्र काढत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपवर टिकेचा बाण सोडला आहे. क्लाईन क्रास्टो हे व्यंगचित्राच्या माध्यमातून अनेकदा भाजपवर खोचक टीका करत असतात. आताही सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात आरोपींची मालिका सुरु केली आहे. त्यावरुनच क्रास्टो यांनी भाजपवर टीका केलीय. (Clyde Krasto responds to Kirit Somaiya’s allegations through caricature)

‘धंदा कैसा चल रहा है’ असं एक ग्राहक स्थानिक झेरॉक्स मालकाला विचारत आहे. त्याला ‘किरीट भाई की दया से सब बढिया है’ असं उत्तर मालक देत असल्याचं व्यंगचित्र काढून क्लाईड क्रास्टो यांनी भाजपच्या दयेने स्थानिक झेरॉक्स व्यावसायिकांना निदान सुगीचे दिवस म्हणजे ‘अच्छे दिन’ आल्याचा सणसणीत टोला लगावला आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर झेरॉक्सच्या प्रति दाखवत असल्याचा किरीट सोमय्या यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावर क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून भाजपला’ जंबो झेरॉक्स’ असे फटकारे लगावले आहेत.

गोव्यात गेलो तरी ‘मी पुन्हा येईन’

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यावरुनही क्लाई़ड क्रास्टो यांनी फडणवीसांनावर बोचरी टीका केली होती. गोव्याच्या बीचवर पर्यटकाच्या वेशभूषेत ‘मी पुन्हा येईन’ असा महाराष्ट्राला दिलेला गर्भित इशाऱ्याचा फलक घेऊन उभे असलेले देवेंद्र फडणवीस गोव्यात ‘फक्त पर्यटन’ करुन परतणार, अशा आशयाचे व्यंगचित्र काढून क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांची ‘सुप्त इच्छा’ समोर आणली होती. भाजपने गोवा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. मात्र गोव्यापेक्षा महाराष्ट्रात सत्ता आली तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची फडणवीस यांची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची सत्ता फडणवीस आणतील का याबाबत क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

क्लाईड क्रास्टो यांची व्यंगचित्राद्वारे फडणवीसांवर टीका

क्लाईड क्रास्टो हे आपल्या कुंचल्यातून नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आणि भाजपवर फटकारे मारत असतात. आताही देवेंद्र फडणवीस यांची गोवा प्रभारी निवड झाल्यावर क्लाईड क्रास्टो यांनी गोवा बीचवर ‘आव गोयंचो सायबा’ म्हणत फडणवीस यांची रंगबिरंगी कपड्यातील पर्यटक अशी खिल्ली उडवली आहे. तिथेही जाऊन आपली ‘मी पुन्हा येईन’ ही सुप्त इच्छा प्रकट करत असल्याचा टोला व्यंगचित्राच्या कुंचल्यातून क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाच अर्थ काय?; प्रविण दरेकरांनी मांडल्या दोन थिअरी!

“कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल”

Clyde Krasto responds to Kirit Somaiya’s allegations through caricature