पुन्हा युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? फडणवीस म्हणतात…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात युती तर झाली आहे. पण पुन्हा युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजेशीर उत्तर दिलं. काय करायचं आणि कधी करायचं ते सगळं ठरलेलं आहे. हा सस्पेन्स आहे जो योग्य वेळी सांगितला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना […]

पुन्हा युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? फडणवीस म्हणतात...
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात युती तर झाली आहे. पण पुन्हा युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजेशीर उत्तर दिलं. काय करायचं आणि कधी करायचं ते सगळं ठरलेलं आहे. हा सस्पेन्स आहे जो योग्य वेळी सांगितला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समोर बसलेले होते.

लोकमतच्या महाराष्ट्रीय ऑफ दी इयर या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचीही उपस्थिती होती. मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनाही स्टेजवर बोलावण्यात आलं आणि काही प्रश्न विचारण्यात आले. मुख्यमंत्र्यांबद्दलच्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या.

लोकमतच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होते. त्यांना ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच समारंभात भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी, जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, अभिनेते विकी कौशल, इस्त्रायलमध्ये प्रकाशित होणाऱ्या मायबोली या मराठी मासिकाचे संपादक नोह मासिल आणि क्रिकेटर स्मृती मानधना उपस्थित आहेत. यावेळी दीपिका पदुकोण, विकी कौशल आणि रोहित शेट्टी यांच्याशी गप्पांची मैफलही रंगली.

रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांना युतीबाबत प्रश्न विचारले. पण मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर चांगलीच फटकेबाजी केली. युतीमुळे भाजपचेच कार्यकर्ते नाराज आहेत, असं रितेशने विचारलं. पण कार्यकर्ते नाराज असले तरी दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा होतीच, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य मंत्रीमंडळाचा प्रस्तावित विस्तार गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर आहे आणि पुढच्या अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, एवढंच उत्तर मुख्यमंत्र्यांकडून मिळतं. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, अनेक इच्छुक मंत्रीमंडळ विस्तारासाठी येत असतात. पण याचं उत्तर कसं द्यायचं हे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून शिकलोय. ते नेहमी उत्तर द्यायचे की पुढच्या अधिवेशनापूर्वी विस्तार होईल. मीही तेच उत्तर देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाहा संपूर्ण मुलाखत