AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाले ? वाचा…

आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाले ? वाचा...
Fadnavis Uddhav and Raj Thackeray
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 27, 2025 | 5:09 PM
Share

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु असताना आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणं योग्य नाही.’

दोन्ही पक्षांच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनातलं घडेल असं म्हटलं होतं. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणूकीत दिसलं आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या भेटीमुळे आनंद झाला – उद्धव ठाकरे

राज ठाकरेंच्या भेटीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘भेटीमुळे आनंद द्विगुणीत झाला. नुसता द्विगुणीत नाही. कित्येक पटीने गुणीत झाला आहे. त्यामुळे नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल. आम्ही अनेक वर्षाने भेटलो. ज्या घरात वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीत गेलो. आज बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषेत द्विगुणीत शब्द आहे. पण त्या पेक्षा कित्येक पटीने हा आनंद मोठा आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या शुभेच्छा

आज राज ठाकरेनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात राज यांनी ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या असं म्हटलं होतं.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक