Cm Eknath Shinde Video : आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला, उद्या पँट ओढतील, विनायक राऊतांची घणाघाती टीका, तर अजित पवार म्हणातात काय काय ओढतील…

यावरून आता विरोधक सडकून टीका करू लागलेत, तसेच पत्रकार परिषदेत येणाऱ्या चिठ्ठ्या असुद्या, किंवा एकनाथ शिंदे यांचे बोलायला उभा राहताना फडणवीस यांना विचारणं असू द्या या सर्व घटना चर्चेत येऊ लागलेत.

Cm Eknath Shinde Video : आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला, उद्या पँट ओढतील, विनायक राऊतांची घणाघाती टीका, तर अजित पवार म्हणातात काय काय ओढतील...
आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला, उद्या पँट ओढतील, विनायक राऊतांची घणाघाती टीका
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 15, 2022 | 5:52 PM

कोल्हापूर : राज्यात ऐतिहासिक बंड होऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रूपाने राज्याला नवं सरकार मिळालं. मात्र आता या नव्या सरकारच्या लांबलेल्या कॅबिनेटच्या शपथविधी (Maharashtra Cabinet) वरून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माईक ओढा ओढीवरून सर्वत्र टिका होऊ लागली आहे. त्याचं झालं असं मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चालू होती. बाजूला फडणवीसही बसले होते. पत्रकारांनी एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला सुरू केलं तेवढ्यात फडणवीसंनी थेट त्यांच्या समोरचा माईकच काढून घेतला आणि त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकलं आणि माइक पुन्हा परत ठेवला. पण मुख्यमंत्री बोलत असताना असा अचानक माइक काढून घेणे किती योग्य आहे? यावरून आता विरोधक सडकून टीका करू लागलेत, तसेच पत्रकार परिषदेत येणाऱ्या चिठ्ठ्या असुद्या, किंवा एकनाथ शिंदे यांचे बोलायला उभा राहताना फडणवीस यांना विचारणं असू द्या या सर्व घटना चर्चेत येऊ लागलेत.

माईक घेतल्याचा व्हिडिओ

उद्या पॅन्ट ओढून नागडं करतील-राऊत

याच माइक ओढाओढीवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली, हे घटकेचं राज्य सहा महिने टिकलं तर नशीब असे म्हणत आज माइक ओढत आहेत, उद्या पॅन्ट ओढून नागडं करतील यांना, आज जे बंडखोर आहेत यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही अशी घणाघाती टीका केली. एकनाथ शिंदे आणि आमदारांचं बंड झाल्यापासून एकीकडून संजय राऊत आणि दुसरीकडून विनायक राऊत असे दोन राऊत बंडखोरांवर सतत हल्लाबोल चढवत आहेत.

विनायक राऊत काय म्हणाले तेही ऐका…

अजित पवारांनीही पुन्हा डिवचलं

फक्त विनायक राऊतच नाही तर याच माइक ओढाओढीवरून आज अजित पवारांनी पुन्हा शिंदे फडणवीस यांना डिवचलं आहे. सत्ता येथे जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आले नाही. हे सरकार किती दिवस चालेल हे माहीत नाही आज माइक ओढा ओढी सुरू आहे. उद्या काय काय ओढतील याचा भरोसा नाही. दोघांचं सरकार चालतंय, मात्र मंत्रिमंडळ विस्तार करायला हे का घाबरत आहेत? असा सवाल आज अजित पवारांनी पुन्हा केला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात नुकसान झालं, निर्णय घ्यायला हवे होते, त्या त्या जिल्ह्यात मंत्री असते, पालकमंत्री असते तर निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान झाली असती, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार काय म्हणाले तेही ऐका…