AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kota School Book Controversy : मुस्लिम नसलेल्या मुलांना “अम्मी अब्बू” म्हणायला शिकवलं जातंय, पुस्तकाचा दाखल देत बजरंग दल आक्रमक

बजरंग दलाचे म्हणणे आहे की कुटुंबातील सदस्यांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांना शाळेत शिकवल्या जाणाऱ्या या पुस्तकाची माहिती दिली आहे. मात्र अद्याप एकाही पालकाने गुन्हा दाखल केलेला नाही.

Kota School Book Controversy : मुस्लिम नसलेल्या मुलांना अम्मी अब्बू म्हणायला शिकवलं जातंय, पुस्तकाचा दाखल देत बजरंग दल आक्रमक
मुस्लिम नसलेल्या मुलांना "अम्मी अब्बू" म्हणायला शिकवलं जातंय, पुस्तकाचा दाखल देत बजरंग दल आक्रमकImage Credit source: social media
| Updated on: Jul 15, 2022 | 2:09 PM
Share

कोटा : राजस्थानमधील कोटामध्ये (Kota School Book Controversy) एका पुस्तकावरून आता पुन्हा वाद पेटला आहे. या पुस्तकावर बजरंग दलाकडून (Bajrang Dal) आक्षेप घेण्यात आला आहे. बजरंग दलाने विभागीय आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून इयत्ता दुसरीत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकावर (School Book) आक्षेप घेतला आहे. गैरमुस्लिम मुलांना अम्मी आणि अब्बू बोलायला शिकवले जात असल्याचा आरोप आहे. हे पुस्तक इंग्लिश मीडियम स्कूलचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये आईला अम्मी आणि वडिलांना अब्बू असे लिहिले आहे. एका धड्यात हा प्रश्नही विचारण्यात आला होता की आई-वडील आणि आजी-आजोबा यांना घरच्या भाषेत काय म्हणतात? बजरंग दलाचे म्हणणे आहे की कुटुंबातील सदस्यांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांना शाळेत शिकवल्या जाणाऱ्या या पुस्तकाची माहिती दिली आहे. मात्र अद्याप एकाही पालकाने गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे बजरंग दलाच्या आक्षेपावरून शिक्षण विभागाने तक्रार नोंदवली आहे.

कोणत्या धड्यावरून वाद?

या वादग्रस्त पुस्तकाची 113 पाने आहेत. पहिल्या अध्यायात ‘टू बिग टू स्मॉल’मध्येच मुलाला नवीन शब्द म्हणून आईला आई आणि वडिलांना अब्बू म्हणायला सांगितले आहे. याच पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणातील ‘आजोपा फारूक यांची बाग’ या नावाने मुस्लिम पात्र अमीर आणि त्याचे आजोबा फारूख यांचे उदाहरण देण्यात आले आहे.

हेच ते वादग्रस्त पुस्तक

बजरंग दलाचे गंभीर आरोप

याच पुस्तकाच्या सहाव्या प्रकरणात पान क्रमांक 20 वर पालक स्वयंपाकघरात आहेत आणि ते बिर्याणी बनवत आहेत असे सांगितले आहे.यामुळे मुलांना मांसाहारी इस्लामिक पदार्थ खायला प्रवृत्त होत आहे, असाही आरोप आता बजरंग दलाकडून करण्यात आला आहे. तेसच कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे की आमची मुले आता अब्बू, अम्मी म्हणू लागली आहेत आणि ते घरी बिर्याणी बनवायला सांगत आहेत, असेही बजरंग दलाकडून सांगण्यात आले आहे. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षणाच्या इस्लामीकरणासाठी अशी पुस्तके दिली जात असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचे बजरंग दलाने सांगितले.

पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

भारताला हिंदू मुस्लिम हा वाद नवा नसला तरी. गेल्या काही दिवसात हा वाद शाळांपर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता या पुस्तकावरून आरोप झाल्याने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी ही बजरंग दलाकडून करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाची मात्र याबाबत अद्याप कोणतीही बाजू किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे ते यात काय भूमिका घेतात हेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.