AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’10 दिवसात मंदिर सोड, नाहीतर गळाच कापू’ पुजाऱ्याला धमकावलं! म्हणाले, कन्हैयालाल सारखा हाल करु

Udaipur Row : एका पत्राद्वारे ही धमकी पुजाऱ्याला देण्यात आली आहे.

'10 दिवसात मंदिर सोड, नाहीतर गळाच कापू' पुजाऱ्याला धमकावलं! म्हणाले, कन्हैयालाल सारखा हाल करु
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 15, 2022 | 1:42 PM
Share

राजस्थानात (Rajasthan News) हिंदू समाजातील लोकांना धमकी (Udaipur Threaten) मिळण्याचं सत्र सुरु आहे. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भरतपूर कॉलेजात (Bharatpur Collage) बनवण्यात आलेल्या मंदिराच्या पुजाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 10 दिवसांत मंदिर सोड, नाहीतर तुझा गळाच चिरु, अशी धमकी पुजाऱ्याला देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी पुजाऱ्याला देण्यात आली आहे. या धमकीमुळे कॉलेज परिसरात खळबळ माजलीय. जर वेळीच ऐकला नाहीत, तर तुझा हाल कन्हैय्यालाल सारखा करु, असा इशाराही पुजाऱ्याला देण्यात आला आहे. दरम्यान, आता या कॉलेजीतील मंदिरात काम करणाऱ्या पुजाऱ्याने एक तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांनी या धमकीला गांभीर्यानं घेतलं असून तातडीनं तपासही सुरु करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एबीव्हीपीकडून या घटनेच्या विरोधात कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच टाळं लावून निदर्शनं केली आहेत. त्यामुळे कॉलेजच्या आवारात तणाव निर्माण झालाय. अमल उजालानं याबाबतचं वृत्त दिलंय.

पोलीस सतर्क!

राजस्थानात सुरु असलेल्या हिंदू लोकांना धमकीचं सत्र गेल्या काही काळापासून सुरु आहे. कन्हैया लाल या टेलरच्या हत्येनंतर एकच खळबळ राजस्थानात उडाली होती. संपूर्ण देशभरात कन्हैय्या लाल हत्याप्रकरण गाजलं होतं. त्यानंतर राजस्थानासह संपूर्ण देशात घडामोडींना वेग आला होता. अशातच आता आणखी एका पुजाऱ्याला धमकी देण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. सध्या स्थानिक पोलीस तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाते आहे. तसंच आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.

कन्हैय्या लाल हत्या प्रकरण काय आहे?

नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर कन्हैय्या लाल यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात सोशल मीडियात पोस्ट केली होती. या पोस्टला विरोध करत कन्हैय्या लाल या टेलरचं काम करणाऱ्या उदयपूरमधील इसमाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली. त्यानंतर खरोखरंच कन्हैय्या लाल यांचा दोघांनी गळा चिरत त्यांची निर्घृण हत्या केली.

हत्या करतानाचा व्हिडीओही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियात अपलोडही करण्यात आलेला. दरम्यान, त्यानंतर उदयपूरमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीनं याप्रकरणी गंभीर पावलं उचलत दोघांना अटक ही केली होती.

महाराष्ट्रातही पडसाद

दरम्यान, कन्हैय्या लाल हत्या प्रकरण जातं असताना इथे महाराष्ट्रातील अमरावतीमध्येही उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतरही राजकारण ढवळून निघालं होतं. दरम्यान, आता पुजाऱ्याला देण्यात आलेल्या धमकीमुळे परिस्थिती आणखी तापण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यात येतेय. तर दुसरीकडे इकडे अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा मध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा