…जेव्हा मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या मंत्र्याला सेल्फी काढायला शिकवतात!

| Updated on: Feb 05, 2021 | 11:29 AM

मंत्री शिंगणेंच्या हाताला हात लावून, मोबाईल जरासा उंचीवर पकडून त्यांनी एक छानसा सेल्फी घेतला. | Cm Uddhav Thackeray teach Selfie To Rajendra Shingane

...जेव्हा मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या मंत्र्याला सेल्फी काढायला शिकवतात!
...अन् मुखमंत्र्यांनी राजेंद्र शिंगणेंचा सेल्फी क्लास घेतला
Follow us on

बुलडाणा : फोटोग्राफी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी ऑक्सिजन आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. लोणार सरोवराच्या पाहणीदरम्यान त्यांनी आपल्या मोबाईलमधून सरोवराचे सुंदर फोटो काढले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो आपले सहकारी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे यांच्याकडे… अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेले शिंगणे यांना मुख्यमंत्र्यांनी सेल्फी काढायला शिकवला. (Cm Uddhav Thackeray teach Selfie To Rajendra Shingane over Lonar lake visit)

आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी मुंबईवरुन बुलडाण्याच्या दिशेने प्रयाण केलं. सकाळी साडे नऊच्या आसपास ते लोणार सरोवरावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री राजेंद्र शिंगणे तसंच शासकिय अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान सरोवराचं देखणं रुप बघून मुख्यमंत्र्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सरोवराचा नजारा कैद केला.

Cm Uddhav Thackeray Visit Lonar Sarowar

अन् मुख्यमंत्र्यांनी मंत्री शिंगणे यांचा सेल्फी क्लास घेतला…

सरोवराची पाहणी केल्यानंतर तथा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर औपचारिक फोटोसेशन करतावेळी मंत्री शिंगणे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना ती घेता येत नव्हती. साधेभोळे मंत्री असलेले शिंगणे यांना सेल्फी घेण्यास अडचण येतीय हे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सेल्फी क्लास घेतला. शिंगणेंच्या हाताला हात लावून, मोबाईल जरासा उंचीवर पकडून त्यांनी एक छानसा सेल्फी घेतला. सेल्फीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री शिंगणेकडे पाहत छानसं स्मितहास्य केलं.

…अन् मुखमंत्र्यांनी राजेंद्र शिंगणेंचा सेल्फी क्लास घेतला

लोणार सरोवर जैवविविधतेचे भांडार

लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला  त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली.

लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका विकास कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार एकत्रितरीत्या करावा. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे याठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

(Cm Uddhav Thackeray teach Selfie To Rajendra Shingane over Lonar lake visit)

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंमधील छायाचित्रकार जागा, लोणार सरोवर पाहणीवेळी मोबाईल फोटोग्राफी!

Lonar Crater | लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश