महाराष्ट्र सरकार स्थिर, भाजप सत्तेसाठी हपापलेलं : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: May 26, 2020 | 7:47 PM

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहे," अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (Prithviraj Chavan On Political Situation)

महाराष्ट्र सरकार स्थिर, भाजप सत्तेसाठी हपापलेलं : पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

सातारा : “महाराष्ट्रातील सरकार स्थिर असून भाजपमधूनच सरकार अस्थिर आणि राष्ट्रपती राजवटीच्या (Prithviraj Chavan On Political Situation) बातम्या सोडल्या जात आहे. भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहे,” अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कराडमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“भाजपमधील अनेक माणस ही सत्तेसाठी हपापलेली आहे. त्यांना सत्तेत परत (Prithviraj Chavan On Political Situation) यायचं आहे. म्हणून त्यांनी या बातम्या सोडलेल्या आहेत. तसंच काहीही सुरु नाही. महाराष्ट्र सरकार खूप चांगल काम करत आहे. सर्वात जास्त टेस्टिंग या महाराष्ट्रात होत आहे. त्या टेस्टिंग केल्या नाही तर कोण आजारी आहे हे कळणार नाही,” असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

तसेच ज्या राज्यात टेस्टिंगच होत नाही, ते राज्य आम्हाला शिकवणार का? की तुमची संख्या जास्त आहे. कोणाला आजार आहे हे शोधलं पाहिजे आणि त्याला बरं केलं पाहिजे, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपशासित राज्यांना लगावला.

राज्यपालांच्या भूमिकेबद्दल अपप्रचार जास्त 

“राज्यपाल हे फार मोठं घटनात्मक पद आहे. त्याच्यावर टीका करणं योग्य नाही. पण आमच्या सर्वांची अपेक्षा अशी आहे की कोरोना संकट मोठं आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल अपप्रचार जास्त होत आहे. त्यांची अस्थिर करावं अशी भूमिका नाही. ही भाजपचं सुरु आहे,” असेही पृथ्वीराज चव्हाण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी म्हणाले.

“देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारला रोख पैसे ओतावे लागतील. लोकांना विश्वासात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. मात्र ही मानसिकता सरकारची दिसत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटत नाही,” असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त (Prithviraj Chavan On Political Situation) केले.

संबंधित बातम्या : 

Devendra Fadnavis | केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला एकूण 28 हजार 104 कोटी रुपये, देवेंद्र फडणवीसांनी लेखाजोखा मांडला

महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही : राहुल गांधी

पदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का? पृथ्वीराज चव्हाण गोयलांवर कडाडले