“तुम्हाला तुमच्या जन्मदात्याचा अभिमान नाही, ही कुठली संस्कृती?”, पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. वाचा...

तुम्हाला तुमच्या जन्मदात्याचा अभिमान नाही, ही कुठली संस्कृती?, पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल
आयेशा सय्यद | Updated on: Oct 08, 2022 | 10:56 AM

दत्ता कानवटे, प्रतिनिधी, औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांना आपल्या आई वडिलांना शिव्या दिल्या तर चालेल. पण मोदी शहा यांना त्रास दिलेला चालणार नाही म्हणजे ही कुठली संस्कृती? जन्मदात्याबद्दल अभिमान असला पाहिजे. त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी मुलांवर असते. पण चंद्रकांतदादा बोलले ती कोणती हिंदू संस्कृती?, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.

मला माझ्या आई बहिणीवरून बोललं गेलं तरी मी एकवेळ ऐकून घेईल पण मोदींविषयी बोललेलं मी खपवून घेणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर नाना पटोलेंनी भाष्य केलंय.

भाजप सर्वकाही स्वार्थासाठी करतं. रुपयाची किंमत कागदाबरोबर होत चालली आहे. सत्तेसाठी कायपण हे सध्या भाजपचं गणित आहे. दिल्लीच्या तक्तावर शरणागती जाणाऱ्यांना महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही, असंही पटोले म्हणालेत.

पटोले यांनी शिंदे सरकारवरही टीका केली आहे. सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेत.राज्यात अस्थिरता हे सरकार करत आहे. महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचे काम केलं जातंय. भ्रष्टाचार, भय आणि भूक देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला. लोकांचा कल भाजपाच्या विरोधात आहे.महाराष्ट्रातील वेदांतासारखे मोठे प्रकल्प गुजरातला देण्याचे काम या सरकारने केलंय. जनता यांना माफ करणार नाही, असंही पटोले म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरही पटोलेंनी भाष्य केलंय. मोदी शहाचे हस्तक, मोदी-शाह जी स्क्रिप्ट लिहितील तेच मुख्यमंत्री वाचतात. मोदी शाहांची स्क्रिप्ट कोणी ऐकायला तयार नाही.एकनाथ शिंदे फार प्रामाणिक माणूस त्यांनी स्वतः कबूल केलंय की ते मोदींचे हस्तक आहेत. एवढा प्रामाणिक माणूस महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री म्हणून मिळाला हे भाग्यच!, असं पटोलेंनी म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us