स्मृती इराणींनी जिद्द पूर्ण केली, काँग्रेस अध्यक्षांना बालेकिल्ल्यात हरवलं

| Updated on: May 23, 2019 | 8:00 PM

नवी दिल्ली : अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही, तर काही ठिकाणी फक्त एक जागा मिळाली आहे. धक्कादायक निकाल उत्तर प्रदेशात लागलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून पराभव झालाय. अमेठीत स्मृती इराणी यांनी साडे तीन लाखांपेक्षा म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत. राहुल गांधींवर इराणी यांनी 50 हजारांची […]

स्मृती इराणींनी जिद्द पूर्ण केली, काँग्रेस अध्यक्षांना बालेकिल्ल्यात हरवलं
Follow us on

नवी दिल्ली : अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही, तर काही ठिकाणी फक्त एक जागा मिळाली आहे. धक्कादायक निकाल उत्तर प्रदेशात लागलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून पराभव झालाय. अमेठीत स्मृती इराणी यांनी साडे तीन लाखांपेक्षा म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत. राहुल गांधींवर इराणी यांनी 50 हजारांची आघाडी घेतली.

राहुल गांधींनी देखील हा पराभव स्वीकारत स्मृती इराणी आणि भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी अमेठीसोबतच केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती. वायनाडमध्ये त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलाय. पण अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवायचे.

राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 2004 मध्ये अमेठीतून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. त्याअगोदर सोनिया गांधी अमेठीतून निवडणूक लढत होत्या. राहुल गांधी आल्यानंतर सोनिया गांधी रायबरेलीत गेल्या आणि अमेठी मतदारसंघ त्यांनी मुलासाठी सोडला. राहुल गांधींनी अमेठीतून 2004,, 2009 आणि 2014 असा सलग तीन वेळा विजय मिळवलाय. 2014 मध्येही स्मृती इराणी यांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं. त्या पराभवानंतरच त्यांनी अमेठीमध्ये कामाला सुरुवात केली.

काँग्रेसचा मास्टर प्लॅन फेल

काँग्रेसला राहुल गांधींच्या दोन्ही जागांवर विजयाचा विश्वास होता. त्यामुळेच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनाही संसदेत आणण्याचं नियोजन झाल्याचं बोललं जात होतं. राहुल गांधी दोन्ही ठिकाणी जिंकले असते तर त्यांना एक जागा सोडावी लागली असती. या परिस्थितीमध्ये अमेठी मतदारसंघ सोडून प्रियांका गांधींना तेथून निवडून आणणे हे काँग्रेसचं नियोजन होतं. प्रियांका गांधींनीही याबाबत संकेत दिले होते.