AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौकीदार रंगेहात सापडला, प्रेमा खांडूंच्या गाडीत 1 कोटी 80 लाख : काँग्रेस

नवी दिल्ली: अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांच्या गाडीत 1 कोटी 80 लाखाची रोकड सापडली, असा दावा काँग्रेसने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी खांडूंच्या गाडीत रोकड सापडल्याने पंतप्रधानांवरही कारवाई हवी, अशी मागणी काँग्रेसने केली. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील गाडीत रोख रक्कम मिळाल्याचा दावा करत, काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी […]

चौकीदार रंगेहात सापडला, प्रेमा खांडूंच्या गाडीत 1 कोटी 80 लाख : काँग्रेस
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

नवी दिल्ली: अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांच्या गाडीत 1 कोटी 80 लाखाची रोकड सापडली, असा दावा काँग्रेसने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी खांडूंच्या गाडीत रोकड सापडल्याने पंतप्रधानांवरही कारवाई हवी, अशी मागणी काँग्रेसने केली.

अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील गाडीत रोख रक्कम मिळाल्याचा दावा करत, काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ जारी केला. त्यामुळे चौकादारीची चोरी रंगेहात पकडली आहे, असा घणाघात सुरजेवाला यांनी केला.

“पेमा खांडू यांच्या ताफ्यातील गाडीतून रात्री 12 च्या सुमारास ही रोकड जप्त करण्यात आली. सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्यामुळे या घटनांचा निश्चितच एकमेकांशी संबंध आहे. भाजपने कॅश फॉर वोट घोटाळा केला आहे. पैसे घ्या, मत द्या ही पंतप्रधान मोदींची घोषणा आहे”, असं सुरजेवाला म्हणाले.

सुरजेवाला यांनी निवडणुकीत पैसे बाळगण्याबाबतचा नियम सांगितला. आरपीए 1951 नुसार, जर कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडे  50 हजार किंवा 1 लाखापेक्षा अधिक रोकड सापडल्यास आणि त्याच्याकडे त्या रकमेबाबत वैध कारण नसल्यास, तो पक्ष दोषी मानला जातो. लाचखोरीसाठी हा पैसा असल्याचं मानलं जातं, असं सुरजेवाला म्हणाले.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल