चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे, आधी ते थांबवा; संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले

| Updated on: May 15, 2021 | 10:15 AM

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले. (corona is more dangerous than any other cyclone, says sanjay raut)

चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे, आधी ते थांबवा; संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us on

मुंबई: वादळ येत आणि जात असतं. पण या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेलं कोरोना वादळ मोठं आहे. आधी ते थांबवा. त्यासाठी काम करा, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचले. (corona is more dangerous than any other cyclone, says sanjay raut)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले. चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवलं पाहिजे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लसीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. लसीकरणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यातून मार्ग निघेल, असं राऊत म्हणाले.

फोन टॅपिंग ब्लॅकमेलिंगचं हत्यार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप होत आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. देशांमध्ये कोणाचे फोन टायपिंग होत नाही हे सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील.
हा आता राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टायपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टायपिंग ही काही मोठी गोष्ट नाही, असं राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते पटोले?

नाना पटोले यांनी काल ते भाजपमध्ये असताना त्यांचे फोन टॅप केले जात होते असा दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2016-17 साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती आपल्याला खासगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. (corona is more dangerous than any other cyclone, says sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

Tauktae Cyclone | मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, दक्षिण मुंबई, उपनगरात पावसाच्या सरी

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

“फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा”

(corona is more dangerous than any other cyclone, says sanjay raut)