मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’, महाराष्ट्रात काय चाललंय? फडणवीसांचं मिश्किल उत्तर

| Updated on: Mar 11, 2020 | 11:37 AM

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारलाही नजीकच्या काळात हादरे बसण्याचा दावा भाजप नेत्यांनी केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे Devendra Fadnavis on Maharashtra Govt

मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस, महाराष्ट्रात काय चाललंय? फडणवीसांचं मिश्किल उत्तर
Follow us on

मुंबई : मध्य प्रदेशातील ‘ऑपरेशन लोटस’बाबत प्रश्न विचारला असता महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘बघुया काय होतंय’ असं मोघम उत्तर दिलं. मात्र ‘महाराष्ट्रात काय चाललंय?’ या पत्रकारांच्या प्रश्नाला ‘महाराष्ट्रात तर अधिवेशन चाललंय’ असं मिश्किल उत्तर देत फडणवीसांनी प्रश्न टोलावून लावला. (Devendra Fadnavis on Maharashtra Govt)

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. शिंदेंसोबत 19 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अपक्षांच्या पाठिंब्याने चालणारं काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे. आता ज्योतिरादित्यांनी भाजपची वाट धरल्यामुळे ‘कमलनाथ जाणार आणि ‘कमळ’ उमलणार’ असं चित्र आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारलाही नजीकच्या काळात हादरे बसण्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते मात्र सरकारला कोणतीही भीती नसल्याची निश्चिंती व्यक्त करत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात नेमकं काय घडणार आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. (Devendra Fadnavis on Maharashtra Govt)

हेही वाचा : मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही भूकंप होणार : रामदास आठवले

दरम्यान, पुण्यात कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. परदेशात राहणाऱ्या मुलांचे पालक मायदेशी येत असतात, त्यांची नीट तपासणी झाली आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शाळा-कॉलेज बंद करण्यासंदर्भात योग्य पद्धतीने निर्णय घेण्यात यावा. सरसकट निर्णय घेण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक त्या गोष्टी कराव्यात. भीतीचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, असं फडणवीसांनी सुचवलं.

हेही वाचा : नऊ वेळा खासदार, विमान अपघातात मृत्यू, ज्योतिरादित्यांचे पिता माधवराव शिंदेंची कहाणी

अधिवेशन आठवड्याभरात तहकूब करण्यासंदर्भात आमच्याकडे अद्याप माहिती मिळालेली नाही. सरकार नेमका काय प्रस्ताव ठेवते याकडे लक्ष देऊ. मात्र बजेट 31 मार्चपूर्वी मंजूर होणे आवश्यक आहे. कोरोना हा आमच्यासाठी राजकीय विषय नाही, महाराष्ट्राच्या हिताचा आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी साकल्याने विचार करु, पॅनिक निर्माण होईल असा निर्णय नको, असा सल्लाही फडणवीसांनी दिला.

पाहा व्हिडीओ :

Devendra Fadnavis on Maharashtra Govt