‘दुपारी मंत्री दम मारतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं’

| Updated on: Apr 18, 2021 | 11:24 AM

संध्याकाळी 10 ते 15 पोलीस एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकता त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलतात. | Pravin Darekar bruck pharma remdesivir

दुपारी मंत्री दम मारतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us on

मुंबई: रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक कंपनीच्या (bruck pharm)  मालकाची मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा (remdesivir injection) पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अशाप्रकारे ताब्यात घेणे हा कृतघ्नपणा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. (BJP leader Pravin Darekar take a dig at Thackeray govt over interrogation of bruck pharma owner by Mumbai Police)

प्रविण दरेकर यांनी रविवारी यासंदर्भात ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून दुपारी ब्रुक कंपनीच्या मालकाला दम मारला जातो. त्यानंतर संध्याकाळी 10 ते 15 पोलीस एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकता त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलतात. हे कोणत्या प्रकारचं विकृत राजकारण आहे, तेच कळत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

…म्हणून मी भाजपच्या नेत्यांसह पोलीस ठाण्यात आलो: फडणवीस

काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता.

मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पोलिसांचं म्हणणं काय?

या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

(BJP leader Pravin Darekar take a dig at Thackeray govt over interrogation of bruck pharma owner by Mumbai Police)