महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू लागलाय (Remdesivir Injection Maharashtra Government from BJP)

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:18 PM, 12 Apr 2021
महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांची गुजरातमधील फार्मा कंपनीला भेट

दमण (गुजरात) : महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत दमण येथील फार्मा कंपनीत दरेकर आणि लाड दाखल झाले होते. (Prasad Lad Pravin Darekar announces Remdesivir Injection to Maharashtra Government from BJP)

देशात रेमेडेसिव्हीर निर्यातीवर बंदी

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे  केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

राज्यात रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा 

राज्यात कोव्हिडमुळे भयाण परिस्थिती आहे, रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा आहे. ऑक्सिजनचाही तुटवडा होत चालला आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मृत्यूदर कमी करणे तसेच सुविधा वाढवणे हे आव्हान राज्यासमोर आहे. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची काल बैठक बोलावली होती. आजही ते काही सदस्यांशी चर्चा करणार आहेत. कडक निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नाही. त्या संबंधी मुख्यमंत्री निर्णय घेतील. लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्राथमिकता असेल, असंही शिंदेंनी सांगितलं.

पुण्यात पाच हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन येणार

दुसरीकडे, पुण्यात आज संध्याकाळपर्यंत (सोमवार 12 एप्रिल) पाच हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता मिटणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात माहिती देत पुणेकरांना मोठा दिलासा दिला. रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. सध्या पुण्यात जवळपास 70 टक्के रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता आहे. परंतु रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत होण्यास किमान पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

राजेश टोपेंनी उल्लेख केलेला गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट नेमका कसा आहे?

पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता मिटणार, पाच हजार इंजेक्शन रवाना

(Prasad Lad Pravin Darekar announces Remdesivir Injection to Maharashtra Government from BJP)