राजेश टोपेंनी उल्लेख केलेला गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट नेमका कसा आहे?

Gadhinglaj oxygen plant : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj oxygen plant) उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं मॉडेल राज्यभर राबवण्याच्या तयारीत आहे.

राजेश टोपेंनी उल्लेख केलेला गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट नेमका कसा आहे?
Gadhinglaj oxygen plant
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 2:43 PM

कोल्हापूर : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक (Maharashtra corona case) पाहायला मिळत आहे. रुग्णालये फुल्ल झाली आहेत. आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहेच, शिवाय साधनसामुग्रीहीची कमतरता भासत आहे. रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा तर आहेच, पण अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनही मिळत नाही. त्यामुळेच आता राज्य सरकार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj oxygen plant) उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं मॉडेल राज्यभर राबवण्याच्या तयारीत आहे. (What exactly is the Gadhinglaj oxygen plant mentioned by Health Minister Rajesh Tope?)

कोल्हापुरातील हा ऑक्सिजन प्लांट आता राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. कारण, याच प्लांटच्या धर्तीवर राज्यभर ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतंय. टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीतही याच प्लांटबद्दल चर्चा झाली आणि राज्यभर असे प्लांट सुरु करता येतील का याबाबत चाचपणी सुरु असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

“ऑक्सिजन जनरेशन प्लांट टाकण्याचा सल्ला आम्ही दिला. म्हणजे हवेतील ऑक्सिजन काढून हे करता येईल का, तर गडहिंग्लज, कोल्हापूर इथे असा प्लांट उभारण्यात आला आहे. 150 बेडेड हॉस्पिटल आरामशीर चालतं. 300 जम्बो सिलेंडर दररोज भरु शकतात. किंमत जरा जास्त आहे. 80-85 लाखांच्या आसपास आहे. 15 दिवस इन्स्टॉलेशन लागेल, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जरुर असा प्रयत्न करु असं सांगितलं” अशी माहिती राजेश टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर माध्यमांना दिली.

गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांट नेमका कसा आहे?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातही अशीच परिस्थिती होती. या रुग्णालयात लागणारा ऑक्सिजन कोल्हापुरातून म्हणजे 70 किलोमीटरवरून आणावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गडहिंग्लजमधल्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट टाकण्याचे नियोजन केलं.

जानेवारीमध्ये हा प्लांट कार्यान्वित झाला आहे. 80 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्लांटमध्ये दररोज 150 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरू शकेल अशी क्षमता आहे. त्यामुळे या प्लांटमधील ऑक्सिजन सुमारे 100 रुग्णांना उपयोगी ठरू शकतो.

Gadhinglaj oxygen plant 1

Gadhinglaj oxygen plant

हा ऑक्सिजन निर्मितीसाठी वीज बिलाशिवाय कोणताही खर्च नाही. त्यामुळे गडहिंग्लजसाठी हा प्लांट आधार ठरला आहे. हा ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी रोल मॉडेल ठरला असून, असे प्लांट राज्यभरातील उपजिल्हा रुग्णलयात उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे.

या प्लांटच्या निर्मितीसाठी 80 लाखांचा खर्च आला

रोज 150 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर यातून भरु शकतात

दररोज 100 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येतो

वीजबिलाशिवाय इतर कुठलाही खर्च नाही

VIDEO : आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? 

संबंधित बातम्या 

दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच, व्यावहारिक भूमिका घ्या, हसन मुश्रीफ यांचं व्यापाऱ्यांना आवाहन    

Maharashtra lockdown Package : अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदेंची बैठक, मृतदेह विल्हेवाटीवर चर्चा 

What exactly is the Gadhinglaj oxygen plant mentioned by Health Minister Rajesh Tope?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.